

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क | ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला उधाण आले असून पडवळ नगर, वागळे ईस्ट, ठाणे पश्चिम येथे ठाकरे बंधू एकत्र असल्याचे आनंददायी बॅनर लावण्यात आले आहे. बबन गावडे यांनी रविवारी (दि.20) रोजी उबाठा शिवसेनेला 53 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हे बॅनर लावले आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे हे अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे. यासाठी तुम्ही पुढे येणार का? या महेश मांजरेकर यांच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं होत की, "महाराष्ट्र खूप मोठा आहे. कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत."
महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त माझी आहे. पण मग बाकीच्या चोरांना कळत नकळत पाठिंबा देणार नाही. त्यांचा छुपा भेटी किंवा प्रचार करणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्यायची. मग टाळी द्यायची भाषा करा", असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.