

ठाणे : राज्यातील राजकारणात नवीन युतीचे समीकरण दिन्याच्या चर्चा सुरु आहेत. दुरावलेले दोन्ही ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवार (दि.31) रोजी आज ठाकरेंच्या सेनेनं डोंबिवलीत आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात मनसे देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोड्या वेळात मनसेची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्याची आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात एकत्रित करण्याची शक्यता आहे. डोंबिवलीत कल्याण शिळ रस्त्यावरील पलावा उड्डाण पुलाचे काम २०१८ पासून सुरु आहे. या पुलाचे काम पूर्व होण्याच्या अनेक डेडलाईन देण्यात आल्या होत्या. शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेंनी ३१ मे पासून पूल वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे सांगितले होते. मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्याने त्यांनी पुढील तारीख जाहीर न करता जून अखेरीस पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले आहे.
या उड्डाण पुलाच्या काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी मनसेचे तत्कालीन आमदार राजू पाटील हे सातत्याने पाठपुरावा करत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पुलाच्या कामाची पाहणी असो किंवा शासन दरबारी पाठपुरावा करत होते. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ठाकरे सेनेच्या आंदोलनात मनसे देखील सहभागी होऊन राज्यातील ठाकरे बंधूंच्या युतीचा श्री गणेशा डोंबिवलीत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.