Tarapur MIDC Drainage: तारापूर एमआयडीसीत गटार व्यवस्थेची दुरवस्था

गटारी तुडुंब भरून सांडपाणी रस्त्यावर; कामगार व नागरिक त्रस्त
Tarapur MIDC Drainage
Tarapur MIDC DrainagePudhari
Published on
Updated on

बोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारितील तारापूर औद्योगिक क्षेत्रात गटार व्यवस्थेची दुरवस्था उघडकीस आली असून अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरून सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कामगार तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Tarapur MIDC Drainage
Tarapur MIDC: तारापूर एमआयडीसीत पुन्हा वायूगळती; औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न

औद्योगिक क्षेत्रातील विविध भागांमध्ये गटारींची साफसफाई अपुरी असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी गटारी साफ केल्याचा देखावा करण्यात आला असला तरी काढलेला कचरा गटारीच्या शेजारीच टाकून दिल्याने काही वेळातच तो पुन्हा गटारीत जात असल्याने परिस्थिती पूर्ववत होत असल्याची तक्रार उद्योगांतील कामगार व स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरवर्षी गटारींच्या साफसफाईसाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते. मात्र प्रत्यक्षात नियमित आणि प्रभावी साफसफाई होत नसल्याने या टेंडर प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा औद्योगिक वर्तुळात सुरू आहे.

Tarapur MIDC Drainage
Thane Public Toilet Issue: स्मार्ट ठाण्यात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; 10 पैकी फक्त 2 शौचालयांना दरवाजे

बोईसर येथील एमआयडीसी ही राज्यातील मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक मानली जाते. या परिसरात सुमारे 2100 भूखंडांपैकी 1800 औद्योगिक तर सुमारे 300 निवासी भूखंड आहेत. तसेच येथे 1200 हून अधिक लघु, मध्यम व मोठे उद्योग कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या औद्योगिक क्षेत्रात गटारींची अशी दुरवस्था आढळून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Tarapur MIDC Drainage
Titwala Ola Driver Murder: टिटवाळ्यातील बेपत्ता ओला चालकाचा मृतदेह माळशेज घाटात; आरोपी अटकेत

या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून गटारींची नियमित साफसफाई करावी, तसेच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्योग क्षेत्रातील कामगार व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news