NCMC Smart Card: एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी मुदतवाढ; परिवहन विभागाचा महत्त्वाचा निर्णय

स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
MSRTC Smart Card
MSRTC Smart CardPudhari
Published on
Updated on

ठाणे: एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

MSRTC Smart Card
Raigad Political Row: महसुलमंत्र्यांच्या कार्यक्रमात सेना-राष्ट्रवादीत रंगले मानापमान नाट्य; कार्यक्रमातील प्रोटोकॉलवरून तटकरे संतापले

राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत देण्यात येते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

MSRTC Smart Card
Transgender Group Clash: तृतीयपंथीयांच्या दोन टोळक्यांत तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

मात्र, राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news