Transgender Group Clash: तृतीयपंथीयांच्या दोन टोळक्यांत तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

प्रवाशांच्या डोळ्यांसमोर झालेल्या या हाणामारीमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Transgender Group Clash
Transgender Group ClashPudhari
Published on
Updated on

डोंबिवली: मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी दुपारी तृतीयपंथीयांच्या दोन टोळक्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने स्टेशन परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांच्या डोळ्यांसमोर झालेल्या या हाणामारीमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Transgender Group Clash
Maharashtra Politics: दीपके यांची भेट घेण्याची गरज काय होती? एकनाथ शिंदे यांचा शिरसाट, कडू यांना सवाल

स्टेशन परिसरातील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, २४ तास पोलिस गस्त आणि स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करणे, अशी मागणी प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Transgender Group Clash
AI Fake Video Case: एआयनिर्मित बनावट व्हिडिओप्रकरणी महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल; केंद्र सरकारविरोधी अपप्रचाराचा होता आरोप

घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत हाणामारीत सहभागी असलेले सर्वजण पसार झाले होते. व्हायरल व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news