

Sonai Sitai Devi Yatra 2025
कसारा : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेली सोनाई सिताई देवीच्या यात्रेचा आजचा शेवटचा दिवस या यात्रेला पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर सह अनेक ठिकाणाहून भाविक लाखोंच्या संख्येने येतात. आज संध्याकाळी 6 वाजेपासून यात्रेला गर्दी होण्यास सुरुवात झाली असून आज यात्रेच्या शेवटच्या दिवशी खर्डी गाव अंधारात गेल्याने यात्रेला आलेल्या दुकानदारांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाविकांना अंधारातून वाट काढत मंदिराकडे जावे लागत आहे.
महावितरण कंपनीच्या आधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गळथन कारभाराचा फटका खर्डी यात्रेला बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खर्डी नाक्यावरील ट्रान्सफॉर्मर खराब झाले होते स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून देखील ट्रान्सफॉर्मर बदली न केल्याने अखेर यात्रेच्या शेवटच्या दिवशी याचा फटका बसला आहे.
आर्धा खर्डी गाव अंधारात गेल्याने यात्रेला आलेल्या दुकानदारांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात्रेला येणाऱ्या भाविकांना अंधारातून वाट काढत चालावे लागत आहे. यात महिला, वयोवृद्ध व लहान मुलाचे हाल होत आहेत. दरम्यान संपूर्ण रात्रभर सुरु असणाऱ्या या यात्रे दरम्यान अंधार असल्यामुळे भीतीचे सावट पहावयास मिळत आहे.
दरम्यान यात्रेला शहापूर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. परंतु वीज पुरवठा खंडित झाल्याने यात्रेत धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. अनेक व्यापारी, ग्रामस्थ आपल्याला गाडीच्या प्रकाशाने भाविकांना वाट दाखवत आहेत.