

कन्नड : गुप्त खबऱ्याकडून शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी यांना दाभाडी शिवारातील नशोबखाँ सांडेखाँ पठाण यांच्या मालकीच्या शेतातील घरात सुमारे सव्वा कोटीचा गांजा जप्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक आर.बी.सानप यांनी पोलीस पथकासह सापळा रचून ही कारवाई केली. हा गांजा ४०९ किलो इतका आहे. याची किंमत १ कोटी २२ लाख ७० हजार रूपये आहे.
या कारवाईत नशीबखाँ सांडेखाँ पठाण, वय ४२ वर्षे, रा. कंजखेडा ता. कन्नड, इम्राण लियाकत खाँन, वय ३८ वर्षे, मुक्तीवार मुसा खाँन, वय ४५ वर्षे, दोघे रा. वालसमद तहसील कचरावत जि. खरगोन मध्यप्रदेश, विजय रामचंद्र नाहर, वय ३८ वर्षे, रा. आस्का जि.गजम राज्य ओरीसा, रामकृष्ण हरकीत नायक, वय ३३ वर्षे, रा. बावनगंजम ता. टिजली जि. गंजम राज्य ओरीसा यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगराव सानप करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक आर.बी.सानप, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, यांनी केली.