Thane Crime : 50 रुपयांच्या दिवाळीसाठी दुकानदाराला भोसकले

कल्याणमधील घटना; एमएफसी पोलिसांकडून पाच गर्दुल्ल्यांचा शोध सुरू
assault over money
50 रुपयांच्या दिवाळीसाठी दुकानदाराला भोसकलेfile photo
Published on
Updated on

डोंबिवली : दिवाळीसाठी 50 रूपये देण्यास इन्कार केल्याने खवळलेल्या घनचक्कर गर्दुल्ल्याने धारदार चाकूच्या सहायाने दुकानदाराला भोसकले. यात दुकानदार गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे. शिवाय या गर्दुल्ल्याच्या इतर पाच साथीदारांनी देखील हल्ला केल्याने दुकानदार जबर जखमी झाला. हा प्रकार गुरूवारी सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडला असलेल्या एका दुकानात घडला असून एक गर्दुल्ला हाती लागला आहे. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांसह दुकानदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यातील हल्लेखोर गर्दुल्ला हा सराईत गुंड असून यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. अलीकडेच हा गर्दुल्ला तुरूंगातून सुटून बाहेर आला आहे. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा दुकानदार, घाऊक व्यापारी, स्थानिक, खासगी आस्थापना चालकांना पैशांसाठी त्रास देण्यास सुरूवात केली आहे.

assault over money
Navi Mumbai airport expansion : नवी मुंबईच्या विमानतळ विस्ताराला मंजुरी

दिवाळीचा सण असल्याने एका व्यापाऱ्याने कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडला असलेले दुकान सकाळी उघडले होते. दुकान उघडल्यानंतर ग्राहकांची वर्दळ सुरू झाली होती. इतक्यात समोरच्या रस्त्याने चाललेल्या सहा जणांपैकी एकाने दुकानात दुकानदाराकडे दिवाळी म्हणून 50 रुपयांची मागणी केली. अजून बोनी झाली नाही, तर तुला पैसे कुठून देऊ ? असा सवाल करत दुकानदाराने त्या गर्दुल्ल्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून गरजूला पिसाळला. पैसे घेतल्याशिवाय गर्दुल्ल्यांचे टोळके जायला तयार नव्हते. जवळपास अर्धा तास हा तमाशा दुकानासमोर सुरू होता.

इतक्यात काही कळण्याच्या आत एक गर्दुल्ला दुकानदाराच्या अंगावर धाऊन गेला आणि त्याने मारहाण करत दुकानदारावर चाकूने हल्ला केला. हा हल्ला सुरू असताना इतर गर्दुल्ल्यांनी दुकानात घुसून दुकानदाराला बेदम मारहाण केली. हा सारा प्रकार या भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सुरू झाला आहे. दुकानदारावर हल्ला होताच इतर दुकानदार धाऊन आले. त्यांनी दुकानदाराला गर्दुल्ल्यांच्या तावडीतून सोडविले.

assault over money
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांनी दाचकूल पाड्यातील पीडितांची घेतली भेट

काहींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत इतर पाच गर्दुल्ले पसार झाले होते. एकाला पकडून ठेवण्यात दुकानदाराच्या सहकाऱ्यांना यश आले होते. पकडलेल्या गर्दुल्ल्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात सहा गर्दुल्ल्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस फरार गर्दुल्ल्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news