बदलापूरच्या अल्पवयीन मुलींवर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता

बदलापूरचा हादरवणारा दोनसदस्यीय समितीचा अहवाल
Badlapur abuse case
बदलापूरचा हादरवणारा दोनसदस्यीय समितीचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. File Photo
Published on
Updated on

ठाणे पुढारी डेस्क : बदलापूरच्या आदर्श विद्यालयात त्या दोन अल्पवयीन मुलींवर गेल्या 15 दिवसांत अनेकवेळा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता व्यक्त करणारा धक्कादायक अहवाल राज्य सरकारने नियुक्त केलेल्या दोनसदस्यीय समितीने शुक्रवारी दिला.

Badlapur abuse case
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ तोंडावर काळीपट्टी बांधून भरली शाळा

या प्राथमिक अहवालात धक्कादायक निरीक्षणे समितीने नोंदवली आहेत. पीडित मुलींच्या गुप्तांगाला जवळपास 1 इंच इजा झाल्याचे डॉक्टरांचा अहवाल सांगतो. सायकल चालवल्यामुळे मुलींना या जखमा झाल्याचा दावा शाळा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात ही प्रशासनाने मारलेली थाप ठरली. विशेष म्हणजे, मुली दोन तास सायकल चालवतात का, असा प्रश्न तपास अधिकार्‍याने नंतर पालकांनाच विचारला. याचा अर्थ पोलिसांकडे अशी संवेदनशील प्रकरणे हाताळण्याची कोणतीही संवेदनशीलता नाही आणि ज्ञान तर नाहीच नाही, असे ताशेरेही समितीने ओढले आहेत.

मुलींच्या पालकांनी तक्रारी केल्यानंतर शाळा प्रशासन तब्बल 48 तास त्यावर शांत बसल्याचे दिसून आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी 14 ऑगस्ट 2024 रोजी शाळेच्या विश्वस्तांना घटनेची माहिती दिली. मात्र, तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.

गेल्या 1 ऑगस्ट रोजीच या शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला नराधम अक्षय शिंदे याची कोणतीही पार्श्वभूमी तपासण्यात आलेली नव्हती. त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय प्रवेश होता. एका एजन्सीद्वारे त्याची नियुक्ती कोणाच्या शिफारशीने झाली हे शोधण्याची गरज असल्याचे समिती म्हणते. शाळा प्रशासनाचे जे जबाब नोंदवले त्यावरून मोठ्या त्रुटी आढळून येतात. स्वच्छतागृह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर आहे. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीदेखील बसवलेले नव्हते, असेही अहवालात म्हटले आहे. बालहक्क आयोगाकडून आता प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून, येत्या सात दिवसांत उत्तरे मागवण्यात आली आहेत. केंद्रीय बालहक्क आयोगाच्या समितीसमोर जबाब नोंदवण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी शुक्रवारी दुपारी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासकांच्या कार्यालयात बसले होते. तिथेच त्यांना ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे समजले व त्यांनी पळ काढला. त्यांचे मोबाईलदेखील बंद आहेत.

Badlapur abuse case
बदलापूर प्रकरणी संस्थाचालकासह मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करा : विजय वडेट्टीवार

बालहक्क आयोग बदलापुरात

दरम्यान, केंद्रीय बालहक्क आयोगाच्या सदस्य सचिव रूपाली बॅनर्जी-सिंग यांनी शुक्रवारी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पोलिस व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांचे जबाब नोंदवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news