

ठाणे : ठाणे महापालिकेचे लाचखोर माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह तिघांचीही दिवाळी तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. ठाणे न्यायालयाने शंकर पाटोळे आणि आणखी दोघांचा जामीन अर्ज फेटाळल्या- नंतर पाटोळे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र आता उच्च न्यायालयातही जामीन अर्जावर 3 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याने पाटोळे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
लाच घेतल्याप्रकरणी ठाणे महापालिकेचे माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह आणखी दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. सध्या ते तुरुंगात असून या तिघांचाही जामीन अर्ज ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी येऊनही या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. सुरुवातीला ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याला इन्व्हिस्टिगेशन हा शब्द देखील उच्चारता आला नाही. त्यामुळे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी सरकारी वकील आणि लाचलुचपत विभागाला चांगलेच धारेवर धरले होते. तर एक दिवस न्यायमूर्ती सुट्टीवर असल्याने पाटोळे यांच्या जामिनावर सुनावणी होऊ शकली नाही.
त्यानंतर झालेल्या सुनावणीमध्ये मात्र पाटोळे आणि दोघांना जमीन मिळेल अशी अपेक्षा पाटोळे यांचे वकील यांनी व्यक्त केली होती. मात्र ठाणे न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज थेट फेटाळल्याने त्यांना उच्च न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली होती.पाटोळे आणि दोघांच्या जमिनीसाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी आता न्यायालयाची प्रक्रिया होईपर्यंत पाच ते सहा दिवस जाणार असून त्यानंतर दिवाळी असल्याने न्यायालयाला सुट्टी असल्याने त्यांच्या जमीन आर्जवर आता थेट 3 नोव्हेंबरलाच सुनावणी होणार आहे. त्यामुळे दिवाळी ही तुरुंगातच जाणार आहे.