Goa Mandrem Galgibaga Blue Flag Beaches - मांद्रे, गालगीबाग समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पुरस्कार

मांद्रे, गालगीबाग समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पुरस्कार
पणजी: मांद्रे किनारा.
पणजी: मांद्रे किनारा.
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या २४ समुद्रकिनाऱ्यांमध्ये गोव्याच्या दोन किनाऱ्यांचा समावेश झाला आहे. उत्तर गोव्यातील मांद्रे आणि दक्षिण गोव्यातील गालगीबाग या समुद्रकिनाऱ्यांना यंदाच्या पर्यटन हंगामासाठी आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग पुरस्कार जाहीर झाला आहे. शाश्वत किनारी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार पर्यटनाप्रती गोव्याची वचनबद्धता या पुरस्कारांमुळे अधोरेखित झाली आहे.

पणजी: मांद्रे किनारा.
Sindhudurg Crime| ओसरगाव येथे १५ हजारांची गोवा दारू जप्त

राज्याच्या पर्यटनातील महत्त्वाचा टप्पा : मंत्री खंवटे

मांद्रे आणि गालगीबाग किनाऱ्यांना मिळालेली आंतरराष्ट्रीय मान्यता हा गोव्याच्या जबाबदार पर्यटनाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. ऑलिव्ह रिडले कासवांमुळे गालगीबागचे महत्त्व, तर मांद्रेचा वैशिष्ट्यपूर्ण किनारी परिसर संवर्धन यांचा समतोल राखण्याची जाणीव करून देतो, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले.

पणजी: मांद्रे किनारा.
Goa Tops Equality Index | इक्वॅलिटी इंडेक्स २०२६ मध्ये गोवा देशात अव्वल; पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवेत सर्वोत्तम कामगिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.