European Migratory Bird Thane : शहापूरात ‘युरोपियन रोलर’ या प्रवासी स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन

पक्षीनिरीक्षणादरम्यान सामान्य गप्पीदास आणि लाल छातीचा माशिमार हे दोन सामान्य स्थलांतरित पक्षीही दिसले.
European Migratory Bird Thane
European Migratory Birdpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोळखांब : दिनेश कांबळे

ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात युरोपियन निलपंख किंवा टास या आकर्षक प्रवासी स्थलांतरित पक्ष्याचे दर्शन झाले आहे. याच पक्षीनिरीक्षणादरम्यान सामान्य गप्पीदास आणि लाल छातीचा माशिमार हे दोन सामान्य स्थलांतरित पक्षीही दिसले. त्यामुळे शहापूर परिसरातील समृद्ध जैवविविधता आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी असलेले त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

युरोपियन निलपंख हा युरोप आणि मध्य आशियातील प्रदेशात प्रजनन करणारा पक्षी असून स्थलांतराच्या काळात आफ्रिकेकडे जाताना भारतातील काही भागांत विश्रांतीसाठी थांबतो. महाराष्ट्रातील काही भागांत त्याचे दर्शन प्रामुख्याने सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान होते. म्हणून या पक्ष्याचे दर्शन दुर्मिळ वाटते त्याच प्रजातीतील भारतीय निलपंख मात्र भारतीय उपखंडात सामान्यपणे आढळतो. या पक्षीनिरीक्षणातील युरोपियन रोलरचे छायाचित्र वन्यजीव छायाचित्रकार तथा वनपरिमंडळ अधिकारी श्री. योगेश शीद यांनी टिपले आहे.

European Migratory Bird Thane
SKOCH Award 2026 : स्कॉच पुरस्कारावरून सरनाईक व पालिकेत जुंपली

सामान्य गप्पीदास हा रशियातील सायबेरिया, मंगोलिया आणि पूर्व आशियातील समशीतोष्ण प्रदेशात प्रजनन करणारा, तर लाल छातीचा माशिमार हा पूर्व युरोप आणि मध्य आशियातील जंगलांमध्ये आढळणारा स्थलांतरित पक्षी आहे. कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी हे पक्षी हिवाळ्यात भारतीय उपखंडातील उबदार प्रदेशात येतात. आपल्याकडील हिवाळा संपल्यानंतर साधारण मार्च ते मे मध्ये हे पक्षी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात.

शेतकऱ्यांसाठी निसर्गाचे मोफत कीटकनियंत्रक

वन्यजीवमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक, ठाणे जिल्हा, रोहिदास डगळे यांनी सांगितले की, हे पक्षी केवळ निसर्गाची शोभा वाढवत नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी निसर्गाचे मोफत कीटकनियंत्रक म्हणून काम करतात. शेतातील पिकांवर तसेच झाडे, वेली आणि वनस्पतींवर येणाऱ्या विविध कीटकांचे ते भक्षण करतात. त्यामुळे कीटकांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रित होऊन पिकांचे संभाव्य नुकसान कमी होण्यास मदत होते.

European Migratory Bird Thane
Maharashtra CM Srushti Yojana : राज्यात सीएम सृष्टी योजना, मुख्यमंत्री शौर्य पदकाने होणार पोलिसांचा गौरव

परिसंस्थेत प्रत्येक जीवाची महत्त्वाची भूमिका असते. हे पक्षी कीटकांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच काही शिकारी पक्ष्यांसाठी अन्न म्हणूनही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आणि त्यांची संख्या टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे डगळे यांनी नमूद केले. शहापूर परिसरातील जंगल, शेती, गवताळ प्रदेश, जलस्रोत आणि विविध नैसर्गिक अधिवास स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनुकूल ठरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news