Thane water issue : कसाऱ्यात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर

बेकायदेशीर सुरुंग स्फोटामुळे कसारा तलावाचे जलस्रोत आटले
Thane water issue
कसाऱ्यात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न गंभीरpudhari photo
Published on
Updated on

कसारा ः कसारा मोखावणे परिसरात खासगी विकासा कडून बेकायदेशीर रित्या सुरुंग स्फोट घडवून स्वतःच्या फायद्यासाठी बंधारा बांधल्यामुळे कसारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाला हानी पोहचली आहे. अवैद्य सुरुंग स़्फोटा मुळे कसारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात पाणीच नसल्याने कसारा शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत असून कसा-यातील शेकडो महिला, पुरुष, लहान मुले पाण्यासाठी भटकंती करत आहेत.

सन 1985 साली बांधण्यात आलेल्या कसारा तलावतील पाणी क्षमता वाढवण्यासाठी सन 2021 साली 15 कोटी खर्च करून दुरुस्ती व वडिवक्षेत्र तयार करण्यात आले. दरम्यान वाढीव पूरक पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना हाताशी धरून अपूर्ण व निकृष्ट पाणी योजना ग्रामपंचायत कसारा मोखावणे यांच्या कडे वर्ग केली.

Thane water issue
Water Crisis | लांजा पूर्व भागात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

यादरम्यान ठेकेदाराच्या कामाची पारदर्शकता न बघता ग्रामपंचायत ने ताब्यात घेतलेली पाणी योजना 2 वर्ष सुरळीत सुरु राहिली परंतु त्यानंतर पाईप लाईन फुटणे, लीक होणे असे प्रकार सुरु झाले. निकृष्ट दर्जाचे पाईप वापरल्याने तसेच ठीक ठिकाणी एल बो. वैगरे न बसवल्याने पाणी योजनेची पाईप लाईन कुचकामी ठरत असतानाच मागील वर्षी कसारा मोखावणे येथे सुरु असलेल्या रुस्तमजी प्रॉपर्टी या खासगी विकासकाने बंगले, वैगरे साठी प्लॉटिंग चे काम सुरु केले.

या विकासकाला विविध कामा साठी व खासगी बंधरा बनवण्यासाठी परवानगी देण्यासाठी मागील वर्षी ग्रामपंचायत मोखावणे कसारा च्या वतीने ग्रामसभा घेऊन एक मताने ठराव घेण्यात आला. या ठरावात विकासकाला सुरुंग स्फोटसह विविध बेकायदेशीर कामाना परवानग्या देखील देण्यात आल्या. ग्रामसभेचा ठराव असल्यामुळे विकासकाने बेकायदेशीर विहिरी खोदणे, बेकायदेशीर रित्या सुरुंग स्फोट घडवने सुरु केले.

पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाचशे ते सातशे मिटर अंतरावर डोंगर, टेकड्या फोडण्यासाठी दररोज सुरुंग स़्फोट घडवन्यात आले. डोंगर फोडून खासगी बंधारा देखील तयार करण्यात आला परंतु विकासकाच्या नियमितच्या सुरुंग स़्फोटा मुळे कसारा तलावतील जलस्रोत तसेच परिसरातील जिवंत झरे, व जलस्रोत भग्न पावले अनेक जलस्रोत दुभागले गेले. अनेक जिवंत झंऱ्याची दिशा बदलली गेली.

Thane water issue
Catch the Rain campaign : भूजलपातळी वाढविण्यासाठी आता ‌‘कॅच द रेन...‌’

परिणामी या सुरुंग स़्फोटा मुळे व पाण्याच्या गळती मुळे आज मितीस कसारा मोखावणे तलावतील पाणी पूर्ण पणे संपले असून तलावत ओसाड पडलरले दगड,गोटे, चिखल, झाडें हेच शिल्लक राहिले आहे. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस येणाऱ्या पाण्याला देखील नागरिकांना मुकावे लागत आहे. कसारा वासियांना विहिरी, झरे, रेल्वे स्थानाका वरील नळांचा आधार घ्यावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news