‘आधार’साठी शिक्षक दारोदारी; आधार लिंक नसल्याने राज्यातील १ लाख शिक्षकांचे पगार अडकले

File Photo
File Photo

ठाणे; पुढारी डेस्क :  राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ४४ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्यात शाळांना अपयश आल्याने जवळपास १ लाख शिक्षकांचे पगार होऊ शकले नाही. आधार लिंक नसलेल्या शाळांचे शिक्षक शासनाने बेकायदा ठरवले आहेत. त्यामुळे हे पगार अडकले आहेत.

३० एप्रिलपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार लिंक करा, असे आदेश शासनाने दिले होते; मात्र एप्रिल महिन्यात १० वी व बारावीच्या परीक्षा झाल्याने विद्यार्थी उपलब्ध नव्हते. त्याशिवाय इतर वर्गांतील विद्यार्थ्यांच्याही परीक्षा झाल्याने सदर विद्यार्थी शिक्षकांना सापडणे अवघड झाले. परिणामी आधारविना शाळा असा होऊन शिक्षकांचे पगार अडकले आहेत.

ठाणे जिल्ह्यात साडेचार लाख, मुंबईत जवळपास ६ लाख, सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेपाच हजार, रायगड जिल्ह्यात जवळपास दीड लाख, पालघरमध्ये पावणे दोन लाख, कोल्हापुरात ९० हजार, सांगलीत ६० हजार, साताऱ्यात ३९ हजार, अहमदनगरमध्ये ६५ हजार, पुणे ३ लाख, नागपूर १ लाख ६४ हजार, अमरावती एक लाख, वाशिम ५० हजार, गडचिरोली ४६ हजार, अकोला ३० हजार, यवतमाळ ५० हजार, बुलडाणा ७४ हजार, वर्धा ३० हजार, भंडारा २८ हजार, चंद्रपूर ६० हजार, गोंदिया ४० हजार, धाराशिव ४०, नांदेड १ लाख २० हजार, लातूर १ लाख, संभाजी नगर १ लाख ६५ हजार, हिंगोली ५० हजार, परभणी ९० हजार, जालना १ लाख १०, बीड १ लाख २० हजार, जळगाव ६५ हजार, नाशिक २ लाख १० हजार, धुळे ७० हजार, नंदुरबार ६० हजार, सोलापूर १ लाख ६० हजार आदी जिल्ह्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे लिंक झालेले नाही. अशा शाळांच्या शिक्षकांचे पगार अडवण्यात आले आहेत. त्यामुळे कारकुणाच्या कामाचा फटका आता शिक्षकांना बसला आहे.

३० टक्के विद्यार्थ्यांचे आधार लिंक नाही

राज्यात ४ लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढलेले नाही, वास्तवातही पुढे आली आहे. तसेच विदर्भ विभागातल्या एकूण ११ जिल्ह्यातील ३७ लाख विद्यार्थ्यांपैकी ३२ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक झाले असून, अद्याप ५ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक होणे बाकी आहे. मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ३२ लाख विद्यार्थ्यांपैकी २५ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक झाले असून साडेसात लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक झालेले नाही. उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये एकूण ३६ लाख विद्यार्थ्यांपैकी ३१ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक झाले असून ६ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक होणे बाकी आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५ जिल्ह्यांमध्ये ४२ लाख विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३६ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक झालेले असून ६ लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक झालेले नाही. कोकणातील एकूण ७ जिल्ह्यांमध्ये ४० लाख विद्यार्थ्यांपैकी ३० लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक झालेले आहे तर १० लाख विद्यार्थ्यांचे आधार लिंक अद्यापही झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण विद्यार्थी संख्या पाहता ३० टक्के विद्यार्थ्यांचे आधार अद्यापही लिंक झालेले नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news