Thane Fire News | सफायर लाईफ सायन्सेसची आग अजूनही धुमसतेय

पालघर औद्योगिक वसाहतीतील सफायर लाईफ सायन्सेसची आग अजूनही धुमसतेय
पालघर औद्योगिक वसाहत
पालघर औद्योगिक वसाहतीतील सफायर लाईफ सायन्सेसची आग अजूनही धुमसते आहे.pudhari news network
Published on
Updated on

पालघर : पालघर बोईसर रस्त्यावरील औद्योगिक वसाहती मधील सफायर लाइफ सायन्सेस कंपनीला लागलेली आग अजूनही धुमसत आहे.

पालघर औद्योगिक वसाहत
Thane Fire News | पालघर औद्योगिक वसाहतीतील सफायर कारखान्याला भीषण आग

त्यामुळे बाजूला असलेल्या सर्व शासकीय, खासगी आस्थापनाना त्याचा त्रास झाला. आग नियंत्रणात आणण्यासाठी धावपळ करावी लागली खरी. मात्र, आजही या आगीच्या धुरामुळे परिसरातील झाडे कोमेजून गेली असून जवळच असलेले रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम भवन, आयटीआय प्रशिक्षण संस्था, पालघर नगर पालिका येथील कार्यालयांमध्ये काम करणार्‍यांना त्याचा त्रास झाला. आग आटोक्यात आली असली तरी त्याच्या धुराने आज सर्व श्वसनाच्या त्रासाने मेटाकुटीला आले.

रविवारी (दि.२१) रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. कंपनीच्या आजूबाजूला अतिक्रमण असल्यामुळे अग्निशमन दलाचे बंब कंपनीच्या आवारात दाखल होऊ शकत नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. दरम्यान, रासायनिक पदार्थांच्या साठा असलेल्या भागातून तीन ते चार स्फोट झाल्याने आगीच्या तीव्रतेत वाढ झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news