Thane Fire News | पालघर औद्योगिक वसाहतीतील सफायर कारखान्याला भीषण आग

ठाणे : आगीत सफायर कारखाना जळून खाक; स्फोटामुळे आगीचे लोळ
ठाणे - पालघर
सफायर लाईफसायन्स कंपनीला भीषण आग, कामगार सुखरूप, कंपनी जळून खाक झाली आहेठाणे - पालघर

पालघर : पालघर-बोईसर रस्त्यावर असलेल्या पालघर तालुका औद्योगिक वसाहतीमधील सफायर लाइफ सायन्स या औषध उत्पादन घेणार्‍या कारखान्याला आग लागून कारखाना आगीच्या भक्षस्थानी पडला. रविवार (दि.२१) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Summary

पालघर बोईसर मार्गावरील पालघर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास सफायर लाइफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या पॅकिंग विभागात आग लागली. अग्निशमन व्यवस्था उपलब्ध न झाल्याने आग पसरली. तोवर या कंपनीमधील ४५० कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. साडेतीन वाजताच्या सुमारास या कंपनीतील ज्वलनशील रसायन साठवणूक केलेल्या, वातानुकुलीत यंत्रणेचे कॉम्प्रेसर, ड्रम स्फोट झाल्याने या आगीने भीषण रूप घेतले व आग कंपनीभर पसरली. आग लागल्याचे समजताच कंपनीतील 200 ते 250 कामगार यांनी कंपनी बाहेर पळ काढल्याने ते या घटनेतून बालबाल बचावले आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान आगीमुळे झाले आहे.

पालघर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये सफायर लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ही औषध निर्माण कंपनी आहे. रविवार (दि.२१) रोजी दुपारी दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो. आग लागल्यानंतर कंपनीतील काही द्रवरूप सिलेंडरचा स्फोट झाल्याने या कंपनीत आगीने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर कंपनीत मोठ मोठे स्फोट होऊ लागले. आजूबाजूचा सुमारे दीड किलोमीटर परिसरात या स्फोटाचे आवाज येत होते व आगीच्या धुरांचे लोळ दूरवर पसरले होते.

कंपनीत मोठी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पचारण करण्यात आले. सुरुवातीला पालघर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढत जात असल्याने डहाणू अदानी पावर लिमिटेड, तारापूर औद्योगिक वसाहत, भाभा अणूशक्ती केंद्र व वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलालाही पचारण करण्यात आले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.

पराग शहा यांच्या मालकीची ही कंपनी असून गेल्या 40 ते 45 वर्षापासून ही कंपनी येथे औषध तयार करीत आहे. कंपनीमध्ये नायट्रोजनने भरलेले सिलेंडर असल्याने वारंवार स्फोट होत होते व त्यामुळे आग पसरत गेल्याचे सांगितले जाते. या औद्योगिक वसाहतीच्या व कंपनी परिसरात अनेक कारखाने होते. आजूबाजूच्या कंपन्यांनाही काही प्रमाणात या आगेची झळ बसली. घटनास्थळी सर्व प्रशासन यंत्रणा पोहोचली असून पुढील कार्य संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला. चार तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

परिसरात भीतीचे वातावरण

दरम्यान कारखान्यातील रासायनिक पदार्थांच्या साठ्यात आग लागल्या नंतर कारखान्यात तीन ते चार स्फोट झाल्याने आगीच्या तीव्रतेत वाढ झाली होती. आगीमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आगीने रौद्र स्वरूप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या जवानांकडून तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news