'एमसीएचआय' क्रेडिया ठाण्याच्या अध्यक्षपदी सचिन मिराणी

Thane News | अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्याकडून सूत्रे स्वीकारली
CREDAI Thane
जितेंद्र मेहता यांच्याकडून सचिन मिराणी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना Pudhari Photo
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील गृह उद्योगाला चालना मिळावी, विकासकांनी मदत व्हावी आणि ग्राहकांना एकाच छताखाली स्वप्नातील घरे उपलब्ध होण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्री अर्थात एमसीएचआय क्रेडिया ठाण्याच्या नेतृत्वात बदल करण्यात आले. विद्यमान अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्याकडून आज (दि.५) नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन मिराणी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मिरानी यांनी शाश्वत विकास, परवडणारी घरे आणि पायाभूत सुविधांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्याच्यादृष्टीने योजनांची रूपरेषा मांडत ठाणे हे घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी एक पसंतीचे ठिकाण राहील, याची खात्री दिली. (CREDAI Thane)

एमसीएचआय क्रेडिया ठाण्याचे अध्यक्ष म्हणून काम करताना जितेंद्र मेहता संस्थेला वेगळया उंचीवर नेले. विकासकांच्या अडचणी सोडविताना सरकारसोबत मिळून गृह उद्योग इंडस्ट्री वाढीसाठी उपाययोजना सुचविल्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे भाग पाडले. असे काम करीत असताना एमसीएचआय च्या कमिटीमध्ये प्रथेप्रमाणे बदल झाले आणि सचिन मिराणी यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्याची सूत्रे आज स्वीकारल्यानंतर अनेक मान्यवरांनी मिराणी यांचे अभिनंदन केले. त्यामध्ये क्रेडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोमन इराणी आणि डोमिनिक रोमेल यांनी "ठाण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यात जितेंद्र मेहता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि मी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करीत सचिन मिराणी यांना नवीन भूमिकेत त्यांना यश मिळावे, अशा शुभेच्छा दिल्या.

CREDAI Thane
ठाणे : सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षावाल्याने संपवले जीवन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news