RTO Challan Scam: बनावट मॅसेज पाठवून 20 लाखांची फसवणूक

याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fake Message
Fake MessagePudhari
Published on
Updated on

ठाणे: तुमच्या वाहनावरील आरटीओ चलानाचा दंड प्रलंबित असून हा दंड त्वरित न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा बनावट मॅसेज मोबाईलवर पाठवून सायबर चोरट्यांनी ठाण्यातील एका वृद्धाची 20 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना ठाण्यात समोर आली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील 61 वर्षीय जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त असून ते माजिवडा परिसरात राहतात. त्यांना 21 मार्च रोजी आपल्या मोबाईलवर एक मेसेज प्राप्त झाला होता. हा मेसेज तक्रारदार यांनी बघितला असता त्यात आरटीओ चलानाचा दंड बाकी असून तो तातडीने भरा अन्यथा कारवाई होईल, असे त्यात नमूद करण्यात आले होते.

Fake Message
Summer Special Train: रेल्वे चालवणार 34 अतिरिक्त उन्हाळी साप्ताहिक विशेष सेवा

तसेच या मेसेजमध्ये दंडाची रक्कम भरण्यासाठी एक लिंक देखील दिलेली होती. सदर लिंक ज्येष्ठ नागरिकाने उघडताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यातून 13 एप्रिल रोजी 19 लाख 99 हजार 21 रुपये, तर 14 एप्रिल रोजी 17 हजार रुपये अशी एकूण 20 लाख 16 हजार 21 रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेतली.

Fake Message
Jackfruit Trees: डोंबिवली मिलापनगरमध्ये कोकणचा आविष्कार; फणसांनी बहरलेल्या झाडांनी दिला धडधडीत पुरावा

हा प्रकार लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने बँकेत धाव घेत तक्रार नोंदवली. तसेच सायबर फसवणुकीची ऑनलाईन तक्रारही दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news