illegal sand mining : अवैध रेतीसाठ्यांवर महसूल विभागाच्या कारवाईत 23 कुंड्या जमीनदोस्त

प्रशासनाचा अवैध उत्खननाला दणका
illegal sand mining
अवैध रेतीसाठ्यांवर महसूल विभागाच्या कारवाईत 23 कुंड्या जमीनदोस्तpudhari photo
Published on
Updated on

भिवंडी : जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ,अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील तथा उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शना खाली भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांच्या आदेशाने मौजे केवणी व काल्हेर येथील राखीव वन व गुरुचरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अवैध रेती साठवणूक व रेती माफियांच्या बेकायदेशीर कारवायां विरुद्ध महसूल विभागाने गुरुवारी मोठी संयुक्त धडक कारवाई केली.

मंडळ अधिकारी खारबाव सुधाकर कामडी,मंडळ अधिकारी भिवंडी शैलेश भोजने,मंडळ अधिकारी आनगाव गणेश विशे,मंडळ अधिकारी राहूर रविंद्र काळे यांच्या नेतृत्वाखालील सर्व ग्राम महसूल अधिकारी, कांदळवन संधारण घटक ठाणे,वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी,भिवंडी ग्रामीण व नारपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती भिवंडीचे अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही कारवाई करण्यात आली.

illegal sand mining
Jalana news | महसूल विभागाच्या कारवाईत दोन ट्रॅक्टर जप्त, गुन्हा दाखल

या कारवाईमध्ये खाडीमधून अनधिकृतरित्या उपसा करून आणण्यात येणारी रेती साठविण्या साठी तयार करण्यात आलेल्या कुंड्यांवर जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आल्या. यामध्ये मौजे केवणी येथील सर्वे नं. 181/अ, क्षेत्र 22.33.39 हेक्टर आर चौरस मीटर, भोगवटादार गुरुचरण ग्रुप ग्रामपंचायत केवणी-दिवे,येथील 15 कुंड्या व सर्वे नं. 181/ब, क्षेत्र 08.03.61 हेक्टर आर चौरस मीटर, भोगवटादार राखीव वने तसेच मौजे काल्हेर येथील सर्वे नं. 114, क्षेत्र 03.32.85 हेक्टर आर चौरस मीटर, भोगवटादार राखीव वने या क्षेत्रांमध्ये उभारण्यात 8 कुंड्या अशा एकूण 23 अवैध रेती साठवणूक कुंड्यांचा समावेश होता.

illegal sand mining
Nilesh Rane : मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाला धक्का लागू देणार नाही

ही अवैध रेती साठवणूक कुंड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या कुंड्यांमध्ये खाडीमधून चोरी केलेली रेती मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात येत असल्याचे महसूल विभागाच्या पाहणीत निदर्शनास आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news