Railway News | विस्तरित रेल्वेस्थानकासाठी डिसेंबर 2025 उजाडणार

Thane Railway Station: 40 टक्के काम पूर्ण, प्रकल्पाचा खर्च 64 कोटींनी वाढला
Thane Railway Station:
विस्तारित करण्यात येते असलेले ठाणे रेल्वे स्थानकाचे काम file photo
Published on
Updated on

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर 2025 उजाडणार आहे. संपूर्ण प्रकल्पाचे काम 40 टक्केच झाले असून या प्रकल्पाचा खर्च देखील आता 64 कोटींनी वाढला आहे. रेल्वे आणि ठाणे महापालिका या दोन्ही यंत्रणांकडून या प्रकल्पाला गती देण्याचे काम सुरू असून 2025 अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकामधून दररोज दररोज सात ते आठ लाख प्रवासी दररोज प्रवास करत असून संध्याकाळी तर लोकल पकडण्यासाठी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी पकडावी लागते. ठाणे स्थानकावरील हा भार कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंडच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाचे काम रेल्वे आणि ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. 2018 पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली असून आतापर्यंत केवळ 40 टक्के या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र आता या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्ष लागणार असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकल्पात 3.77 एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून 10 एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 327 कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका 142 कोटी तर रेल्वेकडून 185 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. 2018 साली या प्रकल्पाचा खर्च हा 263 कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये 64 कोटींची वाढ झाली असून हा खर्च 327 कोटींवर गेला आहे.

Thane Railway Station:
Thane News | दहिसर ते भाईंदर मेट्रो दोन टप्प्यांमध्ये सुरु होणार ?

असे असेल नवीन विस्तारित रेल्वेस्थानक

  • संपूर्ण ठाणे स्थानक 14.83 एकर जागेवर होणार असून त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला अधिक 2 मजली इमारत उभी राहणार आहे हे काम रेल्वे करणार आहे.

  • या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे.

  • या स्थानकात तीन पादचारी पूल असणार आहेत.

  • परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे.

  • स्टेशन इमारती समोर 150 मीटर लांब व 34 मीटर रुंद असा सॅटिस डेक असणार आहे

  • 2.5 एकर जागेमध्ये 250 चार चाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे.

स्थानकाला जोडणार्‍या 3 मार्गिका

  • पहिली मार्गिका नविन ज्ञानसाधना कॉलेजच्या मागून अप-डाऊन असणार आहेत त्या हायवे पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत.

  • दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे.

  • तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाका मार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे.

प्रकल्पाचे फायदे असे...

  • नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणार्‍या गाड्या होम प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत. तसेच कर्जत, कल्याणच्या दिशेला जाणार्‍या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत.

  • ठाणे स्थानकातील सुमारे 31 टक्के आणि मुलुंड स्थानकातील 21 टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.

170 झोपड्यांच्या सर्वेक्षणाला पुढील आठवड्यापासून सुरुवात

या विस्तारित रेल्वे स्थानकाच्या आड येणार्‍या तब्बल 170 झोपडयांच्या सर्वेक्षणाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर या सर्व झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. धर्मवीर नगर म्हणून हा परिसर ओळखला जात असून या झोपड्या हटवल्यानंतर विस्तारित रेल्वे स्थानकाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news