कल्याणच्या प्रशिल अंबादेने सर केले सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट

कल्याणच्या प्रशिल अंबादेने सर केले सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट

कल्याण; पुढारी वृत्तसेवा :  कल्याणच्या प्रशिल अंबादे याने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले. आहे. माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे प्रशिल अंबादेचे स्वप्न या निमित्ताने पूर्णत्वास गेले असून जगातील सर्वात उंच शिखर सर करण्याचा मान अंबादेने मिळवला आहे. यामुळे अंबादे याने मिळवलेल्या यशामध्ये नव्या विक्रमाची भर पडली आहे. त्याच्या या यशस्वी कामगिरीबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील एकमेव व्यक्ती ज्यांनी ही विक्रमी कामगिरी केल्याचा दावा आहे. प्रशिल हा मूळचा विदर्भातील चंद्रपूरमधील रहिवासी असून सध्या दोन वर्षापासून तो सह्याद्री डोंगर रांगेची भटकंती करत आहे. महाराष्ट्राचा बेअर ग्रिल्स म्हणून प्रशिल अंबादेवी ओळख आहे.
जगातील सर्वांत उंच शिखर जे दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो ज्याची उंची समुद्र सपाटीपासून ५८९५ मीटर (१९३४० फूट) इतकी आहे. प्रशिलला लहानपणापासून इतिहास विषयाची आवड असून त्याला ट्रेकिंगचा छंद असल्याकारणाने त्याने या निमित्ताने हे असाधारण यश खेचून आणले आहे. तसेच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ऐतिहासिकदृष्टया विचार करता आजच्या पिढीला इतिहास कळावा म्हणून युट्यूबच्या माध्यमातून अंबादे हा साध्या सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे.

दरम्यान ऐतिहासिक कामगिरी करताना गेल्या २ वर्षांत २०० हून अधिक किल्ले सर करून सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर ह्या कल्याणच्या संघासोबत सह्याद्रीतील वजीर सुळका, वानरलिंगी सुळका, नवरा नवरी सुळका, अलंग मदन कुलंग यांसारखे अनेक कठीण समजल्या जाणाऱ्या ठिकाणी आरोहण करून लोकांमध्ये अॅडव्हेंचरबद्दल जनजागृती करण्याचे काम प्रशिल अंबादे यू ट्यूबच्या माध्यमातून करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news