Pradeep Purnekar Case : आरोपींच्या अटकेसाठी करणार साखळी उपोषण

राम पूर्णेकर यांची माहिती; आरोपींवर कारवाईसाठी पोलिसांना दिले नवीन पुरावे
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्येला ४२ दिवस उलटले तरी खऱ्या सूत्रधाराला अटक झाली नसल्याने आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एसआयटीला दिलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर राजेंद्र शिंदे याला अटक होईल, असे आज पोलिसांकडून सांगण्यात आल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी करून येत्या दोन-तीन दिवसात मुख्य सूत्रधारावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याची घोषणा केली.

शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी गोळ्या आणि चॉपरने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे मास्टर माईंड म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चौकशी व्यतिरिक्त त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.

Pradeep Purnekar Case
KEM Hospital Lift Issue : केईएमच्या बंद लिफ्टप्रकरणी चौकशी समिती

हत्येच्या वेळी आरोपींसोबत राजेंद्र शिंदे असल्याचा दावा करणारे व्हिडीओ पोलिसांना सादर करण्यात आले आहेत. मात्र दिवाळीमुळे एसआयटीला भेटलो नव्हतो म्हणून आज नवीन पुरावे घेऊन एसआयटी अधिकारी आणि पोलीस आयुक्तांना भेटलो, अशी माहिती प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पत्रकारांना दिली.

पूर्णेकर म्हणजे वडिलांच्या हत्येला ४२ दिवस उलटले तरी पोलीस एकच उत्तर देत आहेत, तपास सुरु आहे, तपास सुरु आहे. राजा शिंदे हा आरोपींसोबत चहा घेतोय, हेल्मेटधारी पाचवा आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळी कसा फिरतोय? हेल्मेटधारी आरोपी हाच राजा शिंदे आहे, असा दावा करीत पूर्णेकर यांनी पोलिसांना महत्वाचा पुरावा दिलेला आहे.

त्या व्हिडिओचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच अटकेची कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितल्याचा दावा पूर्णेकर यांनी केला. पोलिसांना दिलेल्या नव्या पुराव्यांची माहिती दोन तीन दिवसात माध्यमांसमोर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आल्याची माहितीही पूर्णेकर यांनी देऊन त्याची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले. माझ्या वडिलांनी अनधिकृत बाधंकामप्रकरणी तक्रार केलेल्या जेव्हीएम बिल्डर्सला देखील आज पुन्हा चौकशीला बोलावले, हे तुमच्या माध्यमातून समजल्याचे त्यांनी सांगितले.

Pradeep Purnekar Case
Rohit Pawar | भाजपसोबत असताना विलीनीकरणाचा विषयच येत नाही : आ. रोहित पवार

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना भेटून राम पूर्णेकर सोबत असलेल्या सहा व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भांत त्या सहा व्यक्तींनी पोलीस आयुक्तांना भेटून आमच्या जीविताला मीनाक्षी शिंदे यांच्याकडूनच धोका असून त्यापैकी दोन जणांना मीनाक्षी यांची वाहिनी आणि नगरसेवक वायचळ यांच्या कार्यकर्त्याने धमकी दिल्याचे पूर्णेकर यांनी सांगितले.

आमच्या पोलीस संरक्षणाची मागणी म्हणजे शिंदे दाम्पत्यांचे षडयंत्र आहे. विरोधी पक्षाकडून आमच्या जीविताला भीती आहे, त्याचे प्लांनिंग झाल्याचे पुरावे शिंदे यांनी द्यावेत, अशीही मागणी त्या सहा जणांनी पोलीस आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

दिवा विझवून मीनाक्षी शिंदे दिवाळी पहाट करते -पूर्णेकर

दादा माझ्या अंगावर काटे आले. माझे वडील प्रदीप पूर्णेकर घरातील दिवा आहे. आधारस्तंभ होते. तोच दिवा हा मीनाक्षी शिंदे यांनी विझविला आहे. कसली दिवाळी साजरी करू. कसले दिवे लागू. आमच्या घरातील दिवा विझवून मीनाक्षी शिंदे ही दिवाळी पहाट कार्यक्रम करते आणि जणू मी हे काही केलेच नाही असे आव आणत आहे. राजेंद्र शिंदे दिवाळी साजरी करीत आहे. दिवा विझविणारेच दिवाळी साजरी करतात, अशी तीव्र भावना राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.