Teacher Online Attendance: शिक्षकांनो लक्ष द्या! आता रोज ऑनलाइन हजेरी बंधनकारक; राज्य सरकारचा आदेश

‘स्मार्ट उपस्थिती’ प्रणालीद्वारे नोंदणीचे आदेश; मुख्याध्यापकांवर नोंदणीची जबाबदारी
Teacher Online Attendance
Teacher Online AttendancePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण आयुक्तालयाने यासंदर्भात आदेश जारी केले असून, ‘स्मार्ट उपस्थिती’ प्रणालीअंतर्गत स्विफ्टचॅट या ॲप्लिकेशनमधील बॉटद्वारे शिक्षकांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्यात येणार आहे. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती नियमितपणे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय विद्या समीक्षा केंद्राच्या (आरव्हीएसके) ई-अँड-ए फ्रेमवर्कअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शिक्षकांच्या उपस्थितीचे संनियंत्रण केले जाणार आहे. यासाठी डॅशबोर्डच्या माध्यमातून उपस्थितीची माहिती संकलित केली जाणार आहे.

यामध्ये शिक्षकांची उपस्थिती, मूल्यमापन, प्रशासन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विविध बाबींचे संनियंत्रण करण्याचा उद्देश असल्याचे शिक्षण आयुक्तालयाने म्हटले आहे.

Teacher Online Attendance
Old Monk Rum Controversy: रम बंदीने राज्याचा ३५० कोटींचा महसूल बुडाला; ३०० कामगार बेरोजगार झाल्याचा दावा

शिक्षकांच्या ऑनलाइन उपस्थितीची नोंदणी करण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रथम स्विफ्टचॅट ॲप डाउनलोड करून मोबाइल क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी करावी. त्यानंतर स्मार्ट उपस्थिती बॉट सुरू करून शाळेचा ११ अंकी यूडायस कोड आणि शिक्षकाचा शालार्थ आयडी किंवा राष्ट्रीय शिक्षक कोड नोंदवावा.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापकांना ॲपमधील ‘टेक टीचर अटेंडन्स’ पर्यायाद्वारे शिक्षकांची उपस्थिती नोंदविता येईल. शिक्षक उपस्थित, गैरहजर, अर्धी रजा, पूर्ण रजा किंवा प्रशिक्षणासाठी उपस्थित असल्याची नोंद करता येणार आहे.

ज्या शाळांमध्ये शालार्थ पोर्टलवर माहिती उपलब्ध आहे, त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी संबंधित माहितीच्या आधारे नोंदणी करावी. शालार्थ आयडी उपलब्ध नसल्यास यूडायस प्लस पोर्टलवरील राष्ट्रीय शिक्षक कोडचा वापर करता येईल. राष्ट्रीय शिक्षक कोड नोंदविताना त्यापूर्वी ‘एनटीसी’ हा उपसर्ग लावणे आवश्यक आहे.

शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद होत आहे की नाही, याचा आढावा शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी घेणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील उपस्थिती नोंदणीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Teacher Online Attendance
Eknath Shinde: विदेशी शक्तींच्या मदतीने षड्‌यंत्र; सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावरून एकनाथ शिंदे आक्रमक

विद्यार्थ्यांची उपस्थितीही ऑनलाइन

शिक्षकांच्या उपस्थितीसोबतच विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याची सुविधाही स्मार्ट उपस्थिती प्रणालीत उपलब्ध आहे. वर्गशिक्षकांना ‘टेक स्टुडंट अटेंडन्स’ पर्याय निवडून इयत्ता आणि तुकडी निश्चित करता येईल. त्यानंतर गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करून उपस्थिती अहवाल तयार करता येणार आहे.

शिक्षकांची उपस्थिती सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत, तसेच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शाळा सुरू असलेल्या ठिकाणी संबंधित वेळेनुसार नोंदविण्याचे निर्देश आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news