Pradeep Purnekar Case : पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल कर्नाळा जंगलातून जप्त

पिस्तुलाच्या आधारे तपासाला आणखी दिशा मिळण्याची शक्यता
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : ठाण्यातील ‘उबाठा’ पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मारेकऱ्यांनी वापरलेले पिस्तुल पोलिसांनी कर्नाळा येथील जंगलातून जप्त केले आहे.

पूर्णेकर यांची हत्या करणारे अटकेतील आरोपी निखिल यादव व नितेश पवार या दोघांनी हे पिस्तुल कर्नाळा येथील जंगलात फेकून दिले होते अशी माहिती तपासातून समोर आल्यानंतर एसआयटी पथकाने दोघा आरोपींनी सोबत घेऊन मंगळवारी सायंकाळी कर्नाळा जंगल गाठले. यावेळी निखिल यादव याचा मोबाईल देखील जंगलातून जप्त करण्यात आला. त्यामुळे या गुन्ह्यातील तपासात हा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याचे मानले जात आहे.

Pradeep Purnekar Case
Tribal Students Mumbai Protest : आम्ही पुन्हा येऊ; इशारा देत गेले आदिवासी विद्यार्थी

ठाण्यातील उबठा पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी या गुन्ह्याचा उलगडा झालेला नाही. या गुन्ह्यातील पप्या शिंदे, निखिल यादव व नितेश पवार या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि एक अज्ञात मारेकरी अद्याप देखील फरार आहेत.

एसआयटी टीमने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा येथील जंगला जवळील एका डेअरी फर्म मधून निखिल यादव व नितेश पवार दोघा मारेकऱ्यांना अटक केली होती. यावेळी कर्नाळा येथील जंगलातून एक पिस्तुल व आरोपीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. तर खूप शोध घेऊन देखील धारदार हत्यार सापडले नाही.

Pradeep Purnekar Case
Ahilyanagar MD Drugs Case: अहिल्यानगरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ५८ आरोपी निष्पन्न, २१ जणांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news