Ahilyanagar MD Drugs Case: अहिल्यानगरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ५८ आरोपी निष्पन्न, २१ जणांना अटक

मिस्कीन मळा ड्रग्ज प्रकरणाचा एलसीबीकडून तपास; विक्रेते आणि सेवन करणाऱ्यांवरही कारवाई, पसार आरोपींचा शोध सुरू
Drug
DrugPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: तोफखाना पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मिस्कीन मळा रस्त्यावर जुलैमध्ये पोलिसांनी १५५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स जप्त केले. याप्रकरणाचा स्‍थानिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. आतापर्यंत ५८ आरोपी निष्पन्न झाले असून, २१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात ड्रग्सचा पुरवठा व विक्री करणाऱ्यासह सेवन करणाऱ्यांचा समावेश आहे, असे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले.

Drug
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत आक्षेपांचा पाऊस; विखे, राजळे, लहामटे, जगतापांचे अर्ज धोक्यात?

पोलिस अधीक्षक सुदर्शन म्हणाले, जुलै २०२६ मध्ये तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरातील मिस्किन मळा परिसरात एक संशयित कार पकडली होती. कारची तपासणी केली असता त्यामध्ये १५० ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या घरझडती घेतली असता 5 ग्रॅम ड्रग्स आढळून आले होते.

Drug
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेत ‘सुजयारंभ’; विखे-थोरातांच्या एकोप्याने बदलले सहकाराचे समीकरण!

या गुन्ह्याच्या तपासात तोफखाना पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. एलसीबीने ड्रग्सची विक्री करणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेऊन कारवाई करण्यात आली.

Drug
Uber Driver Robbery: उबेर चालकाला कोयत्याचा धाक दाखवून कार लुटली; तिघे जेरबंद

तपासात ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांची नावे निष्पन्न झाली असून त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत ५८ संशयित आरोपी निष्पन्न झाले असून २१ जणांना अटक करण्यात आली आहे. पसार आरोपींचा शोध सुरू असल्याचे अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले.

Drug
Ahilyanagar Zilha Parishad Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन; ९.५० कोटींचा निधी जमा होणार

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

जिल्हा पोलिस दलाकडून ‘ड्रग्स फ्री अहिल्यानगर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे. ड्रग्सची विक्री किंवा सेवन करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. अहिल्यानगर ड्रग्समुक्त करण्याच्या मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही अधीक्षक सुदर्शन म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news