Pradeep Purnekar Case: पूर्णेकरांच्या हत्येतील पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच; पूर्णेकर कुटुंबीयांचा थेट आरोप

Thane Crime : ‘कपडे तेच, बूटही तेच...’; पूर्णेकर कुटुंबीयांनी समोर आणले खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज
Pradeep Purnekar Case: पूर्णेकरांच्या हत्येतील पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच; पूर्णेकर कुटुंबीयांचा थेट आरोप
Published on: 
Updated on: 

ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येत सहभागी असलेल्या मारेकऱ्यांमध्ये हेल्मेट घातलेला पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच आहे, असा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. या वेळी पूर्णेकर कुटुंबीयांनी काही सीसीटीव्ही फुटेज समोर आणले आहेत.

ज्यात हत्येतील चारही आरोपी व राजेंद्र शिंदे हे एकत्र वावरताना व चहा पिताना दिसत आहेत; तर ज्या वेळी हत्या झाली, त्या वेळी हेल्मेटधारी आरोपी आणि सीसीटीव्हीत दिसत असलेल्या राजेंद्र शिंदे यांचे कपडे व बूट सारखेच असल्याचे पूर्णेकर कुटुंबीयांनी निदर्शनास आणून दिले. पोलीस आरोपींना पाठीशी घालत असून, ठाण्यातील सत्ताधारी नेत्याच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोपही पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे.

Pradeep Purnekar Case: पूर्णेकरांच्या हत्येतील पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच; पूर्णेकर कुटुंबीयांचा थेट आरोप
Pradeep Purnekar Case: पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड! टल्ली-पपलूंची रवानगी तळोजा कारागृहात

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेला २७ दिवस उलटले, तरी पोलीस मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना अटक का करत नाहीत, असा सवाल पूर्णेकर कुटुंबीय वारंवार करत आहेत. ठाण्याच्या माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे हेच हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार आहेत, असा निव्वळ आरोप न करता कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधातील अनेक पुरावेही समोर आणले आहेत. राजेंद्र शिंदे हे या हत्येतील आरोपींना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडिओ दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आणला होता. त्यानंतर सोमवारी पत्रकार परिषद घेऊन कुटुंबीयांनी पुन्हा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आणला आहे.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमित सिंग ऊर्फ पपलू वगळता हत्येतील चार आरोपींसोबत राजेंद्र शिंदे दिसून येत आहेत. घटनेच्या वेळी पाचवा हेल्मेटधारी आरोपी हा राजेंद्र शिंदेच होता, असा आरोप करताना पूर्णेकर कुटुंबीयांनी तसे पुरावेही सादर केले. आरोपींसोबत वावरताना राजेंद्र शिंदे यांनी जे कपडे व बूट घातले होते, तेच बूट व कपडे मारेकऱ्यांसोबत असलेल्या पाचव्या हेल्मेटधारी आरोपीने घातले होते, हे सीसीटीव्ही फुटेज व फोटोंद्वारे पत्रकार परिषदेत दाखवून देण्यात आले.

Pradeep Purnekar Case: पूर्णेकरांच्या हत्येतील पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच; पूर्णेकर कुटुंबीयांचा थेट आरोप
Pradeep Purnekar Case: निखिल यादवला राजेंद्र शिंदेने बंदूक चालवायला शिकवलं? राम पूर्णेकरांचा गौप्यस्फोट

या घटनेतील अनेक पुरावे देऊनही पोलीस मुख्य सूत्रधार मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांना अटक का करत नाहीत, असा सवाल प्रदीप पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी उपस्थित केला. पोलिसांचे चौकशी नाट्य केवळ दिशाभूल करण्यासाठी असून ठाण्यातील सत्ताधारी नेत्याच्या दबावाखाली मुख्य सूत्रधारांना वाचवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. येत्या २४ तासांत मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांना अटक झाली नाही, तर आम्ही सर्व कुटुंबीय व समाज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलनाला बसू, असा इशारा या वेळी राम पूर्णेकर यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news