Pradeep Purnekar Case-पूर्णेकर प्रकरणावरून ठाणे पोलिसांमध्ये दोन गट

व्हीडिओच्या फॉरेन्सिक अहवालानंतर होणार कारवाई?; त्या पाचव्या आरोपीचा आणखी व्हीडिओ व्हायरल
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या वेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा पती संशयित आरोपी राजेंद्र (राजा) शिंदे हा हेल्मट घालून घटनास्थळी आरोपींसोबत होता, याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हीडिओसह पुरावे देणारे अन्य १६ व्हीडिओ पोलिसांकडे असतानाही शिंदे याला अटक होत नसल्याने ठाणे पोलिसांविरोधात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. त्यातून पोलीस दलामध्ये दोन गट पडले असून बदनामीच्या खाईत ठाण्याला ढकलल्याची भावना निर्माण झाली आहे.

प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी गोळ्या घालून निघृण हत्या झाली. या हत्येप्रकरणी पाच आरोपीना अटक करण्यात आले. मात्र पूर्णेकर याचे पुत्र राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही हत्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी केल्याचा आरोप केला व पुरवणी जबाबात शिंदे दाम्पत्यांना पोलिसांनी आरोपी केले. पूर्णेकर हत्येचा मास्टर माईंड म्हणून शिंदे दाम्पत्यांवर आरोप करत राम पूर्णेकर यांनी १६ व्हीडिओ ठाणे पोलिसांना दिले.

उत्तर प्रदेशातून पाचवा आरोपी डमी आणून हेल्मेटधारी आरोपी हा राजा शिंदे हाच असल्याचे व्हीडिओ पोलिसांसह माध्यमांना दिले, तरी देखील पोलिसांनी शिंदे दाम्पत्यांना चौकशीसाठी बोलावले नाही. अखेर ठाणेकरांनी रस्त्यावर उतरून ठाणे पोलिसांचा निषेध करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दबावामुळे ठाणे पोलीस कारवाई करीत नसल्याचे आरोप होऊ लागले.

राम पूर्णेकर याने पालकमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा प्रयन्त केला आणि त्यातून पोलिसांनीच रामला ताब्यात घेऊन मोठी चूक केली. पूर्णेकर समर्थकांनी रस्त्यावर उतरून दिवसभर ठाण्यातील रस्ते जाम केले. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि एका नगरसेविकासाठी संपूर्ण शिवसेना बदनाम झाली, अशी भावना ठाणेकरांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर शिवसेनेच्या सुमारे ४० नगरसेवकांनी मीनाक्षी शिंदे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर येण्यास स्पष्ट नकार देत पक्ष नेतृत्वाला योग्य तो संदेश दिला आहे.

Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर हत्या... राजकीय रंग...संशयकल्लोळ

त्यातून पुन्हा एकदा राजा शिंदे याचा हत्येत सहभाग असल्याचे दावे करणारे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन ठाणे पोलीस कुणाच्या दावणीला बांधले गेले आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाणे पोलिसांवर वचक राहिलेला नाही, ठाण्याचे गृहमंत्री कोण आहेत? अशा खुलेआम चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठाण्यातील कायदा सुव्यवस्था बीड पेक्षा किती भयंकर बनली आहे, ठाणे पोलीस कसे राजकारणी, गुंड्याच्या दावणीला बांधली गेले आहेत, याबाबतचे वाभाडे जाहीर सभा आणि पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष काढल्याचे दिसून आले. सर्वसामान्य ठाणेकर देखील राजकारणाच्या दबावाखाली पोलिसांनी कधी लाचारी पत्करली आहे? याबाबत सोशल मीडियावर खुलेआम बोलत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करीत ठाणे पोलिसांकडून मीनाक्षी शिंदे आणि राजा शिंदे यांना व्हीआयपी वागणूक दिली जात आहे. एसआयटीने तब्बल ५० तासांपेक्षा अधिकची चौकशी राजा शिंदे यांची केली. तसेच मीनाक्षी शिंदे यांचीही चौकशी केली. शिंदे दाम्पत्यांचा काही सहभाग नव्हता तर शिंदे याची ५० तास कशासाठी चौकशी केली असे प्रश्न करीत आगरी समाजाने ठाण्यासह जिल्हाभर आंदोलने सुरू केली आहेत.

Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; पळून जात असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक

पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी

दिवाळीमुळे आंदोलने थांबली. मात्र याच काळात आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आरोपींसोबत चहा पिताना उभा असताना राजा शिंदे याने जे कपडे, बूट घातले होते, तेच कपडे, बूट घालणारा हेल्मेटधारी पाचवा आरोपी हा हत्येच्या वेळी प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयाबाहेर मोटारसायकलवर फिरताना दिसत आहे. तो हेल्मेटधारी आरोपी राजा शिंदेच आहे, असा दावा केला जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी पसरली आहे.

फॉरेन्सिक अहवालानंतर अटकेची कारवाई

दिवाळी सणामुळे प्रदीप पूर्णेकर यांच्या मास्टर माईंडला अटक करण्यासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यात आंदोलने सुरु होतील. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची कानउघडणी केल्याचे वृत्त आहे. तर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याने ठाणे पोलीस दलात दोन गट पडल्याची चर्चा रंगली आहे. असे असतानाही व्हिडीओची फॉरेन्सिकमधून पुष्टता होत नाही तोपर्यंत राजा शिंदे याला अटक करायची नाही, असे निर्देश एसआयटीला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.