Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर हत्या... राजकीय रंग...संशयकल्लोळ

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणात विविध पक्षांचे नेते आंदोलनात सहभागी झाले. मात्र, कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि पोलिस तपासातून समोर येणारे तथ्य महत्त्वाचे ठरणार आहे.
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

सुरेश साळवे

ठाणे - उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये जास्त रस घेतला. कदाचित त्यांच्या पक्षाचा विभागप्रमुख असल्याने शिवसेने सोबत मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी रस्त्यावर उतरले आणि ठाण्याच्या लौकिकतेला तडा गेला. शेवटी प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणात आता सत्य आणि असत्य हा प्रश्न गौण राहिलेले आहे.

आता पोलीस तपासात निष्पन्न होणाऱ्या गोष्टी आणि न्यायालयाचा निर्वाळा यामुळेच सत्य काय? आणि असत्य काय? हे स्पष्ट होणारे असले तरीही या प्रकरणात मृतकाच्या मुलाने किंवा परिवाराने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि त्याचे समाधान हेच या प्रकरणाचा खरा तपास असे म्हणता येणार आहे.

प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होऊ न शकल्याने मात्र या प्रकरणात संशय निर्माण झालेला आहे. या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरले हे हि सत्य असू शकते दुसरीकडे राजकारणात उबाठा मागे पडल्याने राजकीय दबाव तंत्र वापरून हत्या प्रकरणात अनागोंदी करण्याची प्रक्रियाही राबविल्याचा संशय व्यक्त होणे साहजिकच आहे.

तर दुसरीकडे ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याची संधी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर विरोधकांना मिळालेली असावी आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो तशी शक्यताही नाकारता येत नाही.

Pradeep Purnekar Case
Vadhavan Port: वाढवण बंदराविरोधात ग्रामस्थ आक्रमक; समुद्रात उतरून सुमारे हजार जणांचे जलसमाधी आंदोलन

या सर्व गोष्टी जर आणि तरच्या जरी असल्या तरीही प्रदीप पूर्णेकरांची घडलेली हत्या ही नियोजनबद्ध घडविण्यात आलेली आहे. यात तिळमात्र शंका नाही. त्यातच अन्य पक्षांचा पाठिंबा हा पदाधिकारी म्हणून सहानुभूतीही ठरू शकते. पण पक्षाच्या पदाधिकार्यांचा मुलगाच या प्रकरणाच्या तळाला जाऊ इच्छित असल्याने त्याला पाठिंबा देणे हि नैतिकताही उबाठासह अन्य पक्षांनी जोपासली असे ही असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आरोप प्रत्यारोप होताहेत एकदुसर्यावर व्यक्तीगत टीका करण्यात येत आहे. या घटनेने काही परंपरा अखंडित झाल्या हे सत्य असले तरीही त्यामागेही काही कारणे असू शकतात मात्र परंपरा खंडित झाली हे सत्य आहे. त्याच प्रमाणे प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचे कुणी भांडवल केले राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला.

हे जरी सत्य असले किंवा असण्याची शक्यता आहे. तरीही निश्चितच प्रदीप पूर्णेकरांची हत्या हि राजकीय आणि देवाणघेवाणीचा वादातून झाल्याचे स्प्ष्ट चित्र आहे. हि हत्या सांगकाम्याप्रमाणे करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी जेरबंद केलेले आहे.

मात्र हत्या कुणी करण्यासाठी सांगितली. या हत्येसाठी आर्थिक खर्च कुणी केला. कुणाच्या इशाऱ्यावरून ही हत्या झाली. याचा शोध आता हत्येच्या एक महिन्यानंतरही समोर आलेले नाही. हे अपयश कुणाचे? हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा; ठाण्यात सर्वपक्षीय कँडल मार्च

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात साम्य अशा २००७ च्या स्नेहल गवारे डोंबवली या प्रकरणासारखा प्रकार दिसत आहे. त्या प्रकरणाचे राजकारण झालेले नव्हते मात्र या प्रकरणात राजकारण झाले राजकीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव पोलिसांवर आहे हे पोलिसांच्या भूमिकेवरूनच स्पष्ट होत आहे. दुसरीकडे गवारे प्रकरणात पोलिसांनी एक वर्षानंतर मुलीच्या प्रियकराला पकडले. ज्यांच्यावर संशय होता ते आई-बाप याना अटक झालीच नव्हती. त्या प्रकरणात पोलिसांचा तपास गुंतागुंतीचा झालेला होता. त्याचप्रमाणे मानपाड्यातील प्रकरणात पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपी पकडण्यापर्यंत तपास केला. मात्र तपासात गोपिनीयता बाळगली. त्यामुळे तक्रारदार याना तपास काय झाला हे कळेनासे झाले त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळेनासी झाली.

हत्या राजकीय नाही पण राजकीय असल्याचा संशय निर्माण झाला. तशा घटना ही घडल्या त्यामुळे ठाण्यातील शिवसेने व्यतिरिक्त सर्वच पक्ष एकवटले आणि आंदोलने सुरु झाली. यात काही चुका झाल्या आणि आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर कापूरबावडी पोलिसांनी केलेल्या कारवाई ही वादग्रस्त ठरली. त्यामुळे राजकीय दबाव असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी पाच आरोपी अटक करून ज्यांच्यावर हत्येचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला त्यांच्या सात वेळा ६ ते ७ तास चौकशी करण्यात आली.

मात्र निष्पन्न काहीच झालेले नाही. राजेंद्र शिंदे यांची एवढी कडक चौकशी केल्यानंतरही काहीच सापडले नाही. किंबहुना सापडले असले तरीही ते दडपण्यात आल्याचा संशय तक्रारदार यांचा असल्याने आणि राजेंद्र शिंदेंना आणि माजी महापूर यांची चौकशी केल्यानंतरही दोघं पॅट-पत्नीनं ना क्लीन चिट देण्यात आली नाही त्यांना सोडून देण्यात लेले नाही.

त्यामुळे प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रश्नांची उत्तरे ही मिळेनाशी झाली. राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलेल्या पुरावे हे सक्षम आहेत कि कुचकामी आहेत. याबाबत खुलासच झालेला नाही तर ते फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आलेले आहेत. हत्येला एक महिना उलटला ठाणे पोलिसांच्या एसआयटी टीमने या हत्या प्रकरणाचा पूर्ण तपस केला. सखोल तपस केला असेही म्हणता येत नाही.

किंवा पोलिसांनी एकदम निकृष्ठ दर्जाचा तपास केला असे ही म्हणता येत नाही. पण पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती देणे गरजेचे होते. राम पूर्णेकर यांचा आरोप राजेंद्र शिंदे आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यावर आहे. याबाबत पोलिसांनी या दोघांचा सहभाग आहे कि नाही याबाबत केलेल्या तपासाचे विश्लेषण करणे गरजेचे होते.

केवळ राजेंद्र शिंदे यांच्या ७ वेळा चौकशी आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एकवेळ ७ तास चौकशी केली. पण चौकशीत काही आक्षेपार्ह आढळले कि नाही हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही लोकांचे राजकीय नुकसान आणि बदनामी होते आहे. हत्येला एक महिना उलटला तरीही प्रश्नचिन्ह हे अपयशच म्हणावे लागेल. पण ते कुणाचे? हा महत्वाचा प्रश्न आहे. सदरचे प्रकरणी आता पोलिसांनी पाच आरोपी पकडून आणले.

त्यांना न्यायालयीन कोठडी झालेली आहे. काही दिवसात आरोपपत्र टाकतील आणि न्यायालयीन संघर्ष सुरु होईल. मात्र राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे हे दोषी कि निर्दोष हे समोर येणार कधी? प्रकरण पोलिसांच्या दृष्टीने मिटलेले असले तरीही मृतकाचा मुलगा राम पूर्णेकर विविध वृत्तवाहिनीवरून स्पष्टपणे माहिती देत आहे.

त्या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण आहे असे चित्र दिसत आहे. हत्येचे मुख्य सूत्रधार कोण? हत्येमागचे कारण काय? राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलेले पुरावे हे सक्षम आहेत कि कुचकामी? हत्येच्या आरोपात अटक केलेला टल्लीचा मित्र सुमित सिंग (हेल्मेटधारी) हा चुकीचा आरोपी असून हेल्मेटधारी अनेक दिवसापासून अगदी अटकेपर्यंत ओळख लपविलेला आरोपी डमी असल्याचा आरोप? हत्येतील पाच आरोपी पैकी परिसरात न राहणाऱ्या सुमित सिंग याने ओळख लपविण्यासाठी का हेल्मेट परिधान केले होते? याचा खुलासा पोलिसांकडून झालेला नसल्याने प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राम पूर्णेकर यांच्या आरोप आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि पोलिसांच्या गोपनीयतेने एकच संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.