Pradeep Purnekar Case: धक्कादायक खुलासा! दोन्ही मुख्य आरोपी प्रयागराजमधील व्हीव्हीआयपी घाटावर लपलेले, एक जण रिक्षाचालक

Pradeep Purnekar Accused: संतोष कनोजीया उर्फ टल्ली आणि अमित सिंग या दोघांनाही पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील व्हीव्हीआयपी घाटपरिसरातून अटक केली.
Pradeep Purnkear Case
Pradeep Purnkear CasePudhari
Published on: 
Updated on: 

Pradeep Purnekar Case Update

ठाणे : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात ठाणे पोलिसांना शनिवारी मोठे यश मिळाले. पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्या टल्ली आणि अमित सिंगला ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. रविवारी दोघांनाही ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

ठाण्यात शिवसेना- उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबररोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पप्या शिंदे या आरोपीला हत्येच्या दिवशीच अटक करण्यात आळी होती. तर पूर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्या संतोष कनोजिया उर्फ टल्ली हा पसार झाला होता. तर सीसीटीव्हीत टल्लीसोबत दिसलेला हेल्मेटधारी कोण याचाही पोलीस तपास करत होते.

Pradeep Purnkear Case
Pradeep Purnekar Case: १,५४५ किमी पाठलाग, १० दिवसांनी अटक! पूर्णेकर हत्येतील टल्ली-पपलू प्रयागराजमधून केले जेरबंद!

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर हेल्मेटधारी आरोपीची ओळख पटविणे आणि त्याचा माग काढणे हे मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेचे पथक गेल्या सहा दिवसांपासून नेपाळ सीमाभागात आणि उत्तर प्रदेश येथे आरोपींचा शोध घेत होते.आरोपी मूळचे उत्तर प्रदेशचे राहणारे असल्याने त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे मित्र मंडळींकडे चौकशी करत होते. यादरम्यान दोन्ही आरोपी प्रयागराजमधील व्हीव्हीआयपी घाट परिसरात लपल्याचे समोर आले.

दोन्ही आरोपींना प्रयागराज येथील नैनी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रविवारपर्यंत दोघांनाही ठाण्यात आणण्यात येईल आणि दुपारी न्यायालयात हजर करण्यात येईल,अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

Pradeep Purnkear Case
Pradeep Purnekar: ठाण्यातील दीडशे एकर जमिनीच्या पुनर्विकासातून पूर्णेकरांची हत्या; वनमंत्री गणेश नाईकांचा आरोप

दोन्ही आरोपींची नावे काय?

एका आरोपीचे नाव अमित सिंग ऊर्फ पपलू असल्याचे समोर आले. तो मिरा-भाईंदर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. तो रिक्षाचालक आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव संतोष कनोजिया उर्फ टल्ली आहे. टल्लीसोबत हेल्मेट घालून फिरणारा तरुण अमित उर्फ पपलू हा होता.

कार जप्त

सध्या तपासात गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार नवी मुंबई येथून जप्त करण्यात आली असून आत्ता ताब्यात घेतलेले दोन्ही मुख्य आरोपी उत्तरप्रदेशला कोणत्या मार्गाने आणि कसे पोचले याचा तपास केला जाणार आहे. या प्रकारणात आरोपींच्या संपर्कात असलेले आणि मदत करणारे या सर्वांची चौकशी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news