Pradeep Purnekar case: हत्येसाठी वापरलेली कार पनवेलमधून हस्तगत

पूर्णेकर यांच्या कार्यालयातील गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यानंतर आरोपींचे पलायन; कार मालकाचा जबाब नोंदविला
Pradeep Purnekar case
Pradeep Purnekar casePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: ठाण्यातील बहुचर्चित प्रदीप पूर्णेकर हत्येप्रकरणी ९ दिवसांनंतर पोलिसांनी अल्टो कार पनवेल परिसरातून हस्तगत केली. या कारच्या मालकाचे जबाबही पोलिसांनी नोंदविलेले आहेत.

मृत प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात गोळीबार करून कोयत्याने वार करून पूर्णेकर यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून पलायन केले होते. त्यानंतर भूमिगत होण्यासाठी शहराच्या बाहेर जाण्यासाठी आरोपींची कारचा वापर केला होता.

Pradeep Purnekar case
Milk Adulteration: दुधात डिटर्जंटसह धोकादायक रसायन! पुण्यापासून इंदापूरपर्यंत भेसळीचे जाळे; २५ जणांना अटक

ही कार गौतम पाटील या तरुणाची असून, ती गणेशोत्सवासाठी आरोपी पप्प्या शिंदे याने मागवून घेतली होती. त्यानंतर ती पुन्हा मागितल्यानंतरही परत न मिळाल्याने व्हॉट्सॲपवर पप्या आणि गौतम यांच्यात संभाषणही झाले होते. त्यानंतर प्रदीप पूर्णेकरची हत्या झाली अन् सर्व प्रकार समोर आला.

Pradeep Purnekar case
GTB Nagar Redevelopment: जीटीबी नगरातील अपात्र गाळेधारकांना मुदत; स्वेच्छेने गाळे रिकामे न केल्यास तोडणार

कारमालक गौतम पाटील असल्याचे निष्पन्‍न झाल्यानंतर त्याला ठाणे गुन्हे शाखा युनीट-५ आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाने बोलावून जबाब नोंदविला आहे. त्यात ही कार पप्प्या शिंदे याने गणेशोत्सवासाठी परिवाराला गणपती दर्शनाला घेऊन जाण्यासाठी मागितलेली होती. त्यानंतर ती पाटील यांनी वारंवार मागूनही परत दिली नाही. तिचा वापर पळून जाण्यासाठी करण्यात आल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news