JNPA watermelon seeds seizure: JNPA बंदरात २५ हजार किलो पाकिस्तानी कलिंगडाच्या बिया जप्त; दोघांना अटक

२५ हजार किलो बिया जप्त, २ जणांना अटक
JNPA watermelon seeds seizure
JNPA watermelon seeds seizurePudhari
Published on: 
Updated on: 

राजकुमार भगत

उरण: भारतात पाकिस्तानातून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीवरील बंदी चुकवण्यासाठी सुरू असलेल्या एका नवीन छुप्या प्रयत्नाला महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआई) जोरदार तडाखा दिला आहे.

'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत कारवाई करत डीआरआईने संयुक्त अरब अमिराती (दुबई) मार्गे भारतात आणल्या जाणाऱ्या सुमारे २५ हजार किलो वजनाच्या पाकिस्तानी कलिंगडाच्या बिया जेएनपीए बंदरात जप्त केल्या आहेत.

याप्रकरणी २२ ऑक्टोबर रोजी दोन जणांना अटक करण्यात आली असून, यापूर्वीही अशाच प्रकारे तस्करी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

डीआरआईला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, जेएनपीए बंदर मार्गे आयात केलेल्या आणि संयुक्त अरब अमिरातीच्या खजूर किंवा खरबुजाच्या बिया असल्याचे घोषित केलेल्या एका कंटेनरची खोलवर केलेल्या चौकशीत असे उघड झाले की, याच आयातदाराने यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये दुबईस्थित पुरवठादाराकडून अशाच प्रकारे २२ हजार किलो खरबुजाच्या बिया युएईच्या बनावट कागदपत्रांद्वारे मागवल्या होत्या.

JNPA watermelon seeds seizure
Karjat Station Platform Extension : कर्जत स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम रखडले

या संपूर्ण रॅकेटमध्ये आयात-निर्यात परवाना धारकाचा मुलगा आणि पुतण्या सक्रिय असल्याचे समोर आले आहे.मुलगा दुबईस्थित पुरवठादार फर्मचा संचालक आहे, तर त्याचा चुलत भाऊ भारतातील आयात प्रक्रिया व देशांतर्गत विक्री सांभाळत होता. या दोघांनाही २२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर कडक प्रतिबंघात्मक पावले उचलली असून, डीआरआईकडून याआधी नाशिकमधील अ‍ॅम्बड सीएफएस येथे ३६२ मेट्रिक टन खजूर आणि अलीकडेच श्रीलंकेच्या मार्गे आलेले ७,३११ मेट्रिक टन हिमालयन रॉक सॉल्ट जप्त करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे.

JNPA watermelon seeds seizure
Panvel Municipal Corporation : मनपाच्या १११ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

देशाच्या आर्थिक सुरक्षेला व व्यापार नियमनांना सुरुंग लावणाऱ्या अशा तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी डीआरआईची मोहीम अशीच कडक सुरू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news