Badlapur News: शिंदेसेनेच्या नगरसेवकांकडून भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण

सनी मारुती पाटील असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव
Badlapur News
Badlapur NewsPudhari
Published on
Updated on

बदलापूर: बदलापुरात शिंदेसेना आणि भाजप यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. सनी मारुती पाटील असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी युवा सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक रोहन पाटील, शिवसेनेचे उपशहर प्रमुख सूरदास पाटील यांच्यासह दहा जणांवर बदलापूर पुर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी पाटील याचे वडील मारुती पाटील हे पालिका निवडणुकीत नगरसेवक रोहन पाटील यांच्या विरोधात भाजपाकडून निवडणुकीला उभे होते. तेव्हापासूनच त्यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. आता एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गट पुन्हा आमने-सामने आले. त्यावेळी नगरसेवक रोहन पाटील, सूरदास पाटील सहकाऱ्यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप सनी पाटील यांनी केला आहे.

Badlapur News
Dahanu Crime News: मुल होत नसल्याने टोमणे मारणाऱ्या भावाची भावाकडूनच हत्या

याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी नगरसेवक रोहन पाटील, माजी नगरसेवक सूरदास पाटील, प्रथमेश अनंता पाटील, राकेश भगवान पाटील, किशोर भालचंद्र शेलार, जनार्दन धर्मा पाटील यांच्यासह दहा जणांना विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news