Crime News: टिटवाळ्यात ‌‘हायप्रोफाईल‌’ घरातून 6 कोटींच्या एक्स्टेंसी गोळ्या जप्त

या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग्ज जाळ्याचे धागेदोरे उलगडू लागले आहेत.
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

टिटवाळा: नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासाला मोठे यश मिळाले असून, टिटवाळ्यातील एका आलिशान सोसायटीतून कोट्यवधींच्या ड्रग्ज साठ्याचा पर्दाफाश झाला आहे. अश्विनी पॉल या महिलेच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 5 हजार एक्स्टेंसी गोळ्या, अंदाजे 6 कोटींचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मुंबईतील ड्रग्ज जाळ्याचे धागेदोरे उलगडू लागले आहेत.

नेस्को प्रकरणानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने साकीनाका येथे कारवाई करत 200 एक्स्टेंसी गोळ्या जप्त केल्या होत्या. या प्रकरणात इरफान अन्सारीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून अश्विनी पॉलचे नाव समोर आले. ती काही महिन्यांपूर्वी कल्याणहून टिटवाळ्यात स्थलांतरित झाली होती.

Crime News
Tarapur MIDC Road Work: तारापूर एमआयडीसीत रस्ते कामांचा अवजड वाहनांना फटका

पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तिचा माग काढला. टिटवाळ्यातील उच्चभ्रू कॉम्प्लेक्समध्ये तिचे घर शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले.

मात्र सलग तपासानंतर शनिवारी रात्री छापा टाकण्यात आला आणि मोठा साठा उघड झाला. या प्रकरणात सुफियान या आरोपीचीही अटक करण्यात आली असून, तो इरफान आणि पॉल यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Crime News
Desi Attar Trend: विदेशी सेंट, परफ्युमला देशी अत्तराचा उतारा

तपासात उघड झाले की, अश्विनी पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करत होती आणि नंतर ती ड्रग्ज सप्लायच्या रॅकेटमध्ये सक्रिय झाली. तिच्याकडून अनेक मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले असून, वेगवेगळ्या क्रमांकांचा वापर करून ती व्यवहार करत होती.

जप्त केलेल्या एक्स्टेंसी गोळ्यांवर मर्सिडीज, डॉलर यांसारखी चिन्हे आढळली आहेत. याआधी नेस्को आणि वरळी येथील कारवाईतही अशाच चिन्हांच्या गोळ्या जप्त झाल्या होत्या, त्यामुळे मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा संशय अधिक बळावला आहे. पोलिस तपासात या रॅकेटमागील आणखी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता असून, या प्रकरणाने टिटवाळ्यातील तथाकथित ‌‘हायप्रोफाइल‌’ जीवनशैलीमागील काळा चेहरा समोर आणला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news