Desi Attar Trend: विदेशी सेंट, परफ्युमला देशी अत्तराचा उतारा

खिशाला परवडत असल्याने अत्तर वापरण्याकडे तरुणांचा कल वाढला
Desi Attar Trend
Desi Attar TrendPudhari
Published on
Updated on

ठाणे: बदलत्या जीवनशैलीच्या आकांक्षा, उत्पन्नात सातत्यपूर्ण वाढ आणि आधुनिकतेचा स्पर्श यामुळे केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागातही सुगंधी उत्पादनांची मागणी वाढत आहे. मात्र महागड्या विदेशी सेंट आणि फार्फ्यूमपेक्षा देशी अत्तर वापरण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. खिशाला परवडत असल्याने आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये अत्तर उपलब्ध असल्याने सध्या देशी अत्तर वापरणे हा सध्या ट्रेंड राज्याच्या सुगंधी बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

Desi Attar Trend
Thane Politics: ठाणे महापालिकेत भाजप शिवसेनेतील धुसपूस कायम

महागडी विदेशी सेंट आणि परफ्युम वापरणे हे एकप्रकारचे स्टेट्स मानले जायचे. अशाप्रकारच्या सुगंधी द्रव्यांचा वापर करण्याची क्रेज केवळ शहर भागात उरली नसून ग्रामीण भागातील तरुणांमध्ये देखिल मोठ्या प्रमाणात याची क्रेज आहे.

त्यामुळे ब्रँडेड परफ्यूमच्या बाजारपेठेला मोठी चालना मिळत आहे. सध्या देशात सुगंधी उत्पादनांचा बाजार सुमारे 2 हजार पेक्षा अधिक कोटींच्या घरात असून वाढती मागणी आणि सुगंधाच्या वेगवेगळ्या ‌‘नोट्स‌’मुळे केवळ विदेशी नव्हे तर टिकाऊ व परवडणारे देशी पर्याय हे त्यामुळेच वाढत आहेत.

सुगंधी द्रव्यांच्या बाजारपेठेत केवळ परफ्यूमच नव्हे, तर डिओ, अत्तर आणि इतर तत्सम उत्पादनांचाही समावेश होतो. यातील अत्तरांचा वापर पूर्वी प्रामुख्याने धार्मिक वा पारंपरिक कारणांसाठी केला जात असे; मात्र आता बदलत्या ट्रेंडमुळे त्याचा वापर वाढत आहे.

विशेषतः तरुणांमध्ये अत्तरांचा वापर अधिक प्रमाणात होत असून, हे उत्पादन कमी किंमतीमध्ये बाजारात उपलब्ध असल्याने ग्राहकांना आणि विशेष करून तरुणांच्या खिशालाही ते परवडत आहे. त्यामुळे देशी अत्तराची मागणी देखील वाढली आहे. राज्यातील सुगंधी द्रव्यांच्या बाजारपेठेत नवे ट्रेंड दिसून येत आहेत. विदेशी परफ्यूमच्या तुलनेत देशी उत्पादनांमध्ये सुधारणा होत असून, त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये देशी पर्यायांची मागणी वाढत आहे.

Desi Attar Trend
Kharif Season: खरीप हंगामासाठी 11,550 मेट्रिक टन खतसाठा मंजूर; जिल्ह्यात 60 हजार हेक्टरवर खरीप नियोजन

सुगंधी द्रव्यांमध्ये हलका आणि लवकर नाहीसा होणारा सुगंध, म्हणजेच ‌‘मिडल नोट‌’ हा सुगंधाचा मुख्य भाग असतो, तर ‌‘बेस नोट‌’ हा दीर्घकाळ टिकणारा सुगंध असतो. या दोन्ही नोट्सचा योग्य समतोल साधल्यास परफ्यूम अधिक आकर्षक आणि टिकाऊ बनत असल्याचे अत्तराचे उत्पादन करणाऱ्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

वाढत्या जागरूकतेमुळे सुगंधांचा वापर दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग बनत असून, ग्राहक आता अधिक दर्जेदार आणि परवडणाऱ्या पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे मात्र खिशाला परवडेल आणि सहज उपलब्ध होईल अशा देशी सुगंधी उत्पादनांना सध्या राज्याच्या बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध होत आहे.

अत्तराचे प्रकार...

नैसर्गिक अत्तर :गुलाब, मोगरा, चंदन, केवडा, जाई, जुई.(विशेष करून उच्च वर्गीय स्तरातील ग्राहकांकडून याला मागणी आहे)

मिश्रित अत्तर : हिना, शमामा, मस्क.(या प्रकारच्या अत्तराचासर्व वर्गातील ग्राहकांची मागणी आहे)

मुख उत्पादक केंद्रे

पुणे जुन्नर/नारायणगाव परिसर : मोगरा आणि गुलाबाच्या अत्तरासाठी प्रसिद्ध

मुंबई आणि ठाणे :उत्पादनासोबतच मोठ्या प्रमाणावर व्यापार आणि वितरणाचे केंद्र.

औरंगाबाद आणि नाशिक :सुगंधी द्रव्यांच्या निर्मितीसाठी ओळखली जाणारी शहरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news