Thane Traffic Diversion : गणेश विसर्जन; वाहतुकीत बदल

बदल १८, १९, २०, २३ आणि अनंत चतुर्दशी अर्थात २५ सप्टेंबर तसेच ३० तारखेला फक्त पनवेल शहर वाहतूक शाखेच्या कार्यक्षेत्रात आहेत.
Ganeshotsav Traffic Diversion
Ganeshotsav Traffic DiversionPudhari
Published on: 
Updated on: 

कोपरखैरणे: गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मार्गांवर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. हे बदल १८, १९, २०, २३ आणि अनंत चतुर्दशी अर्थात २५ सप्टेंबर तसेच ३० तारखेला फक्त पनवेल शहर वाहतूक शाखेच्या कार्यक्षेत्रात आहेत.

कोपरखैरणेकडून ब्ल्यु डायमंड चौकातून शबरी हॉटेल, वाशी से. नं. ०९ व से. नं. १६ मार्केट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी आहे. तर त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून ब्ल्यू डायमंड चौकातून कोपरी सिग्नल, पाम बिच वरुन ऑरेंजा सर्कल मार्गे इच्छीत स्थळी जातील.

Ganeshotsav Traffic Diversion
NMMC Building Case : तत्कालीन सहाय्यक संचालक केकाण यांना क्लीनचिट ?

वाशी प्लाझा सिग्नलकडून छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ब्ल्यू डायमंड चौकाकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी असून वाशी प्लाझा चौकातून पामबिच वरुन महात्मा फुले भवन चौक व ऑरेजा सर्कल मार्गे कोपरी सिग्नल मार्गे जाता येईल.

ऑरेंजा सर्कल, टायटन शो रुम मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणा-या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी असून पर्यायी मार्ग पामबिच मार्गे सिटी बॅक चौकातुन, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नूर मस्जिद, बोहरा मस्जिद मार्गे जागृतेश्वर तलावाकडे येणा-या सर्व वाहनांसाठी प्रवेश बंदी आहे.

Ganeshotsav Traffic Diversion
Mumbai food safety action : नायरच्या कॅन्टीनसह मुंबईतील ७ आस्थापनांचे परवाने निलंबित

नो पार्कींग क्षेत्र खालीलप्रमाणे

कलश उद्यान चौक, (बोनकोडे बस स्टॉप) से ११ ते वरिष्ठा चौक से २० कोपरखैरणे. सिरॉक प्लाझा प्लॉट नं २६,२७,२८ से १९ए ते स्मशानभुमी (शंकर मंदिर) खाडी किनारी से. १९ सी, कोपरखैरणे. गणेश दर्शन को हौ. सोसायटी प्लॉट नं २३३/२३४ सेक्टर १९ ए. कोपरखैरणे ओम साई कृपा प्लॉट नं २०/२१/३६/३७ सेक्टर १९. स्मशानभुमी (शंकर मंदिर) खाडी किनारी से १९ सी, कोपरखैरणे ते भुमीपुत्र मैदान खाडी किनारी जवळील रस्ता सेक्टर २३ कोपरखैरणे येथे क्षेत्र घोषित करण्यात येत आहे. कोपरखैरणे ते भुमीपुत्र मैदान खाली किनारी जवळील रस्ता क्षेत्र घोषित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news