Mumbai food safety action : नायरच्या कॅन्टीनसह मुंबईतील ७ आस्थापनांचे परवाने निलंबित

कुलाब्यात अन्नसाठ्याजवळच स्वच्छतागृह; ३५ पैकी ३४ कर्मचारी प्रशिक्षणाविना
Mumbai food safety action
Mumbai food safety actionAI image
Published on
Updated on

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत धडक कारवाई करत नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात अन्न आस्थापनांचे परवाने तातडीने निलंबित केले आहेत. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. विशेषतः कुलाब्यातील ऑलिम्पिया कॉफी हाऊसमध्ये तपासणीदरम्यान अन्नसाठ्याच्या परिसरातच स्वच्छतागृह असल्याचे उघड झाले.

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये अन्नसुरक्षा व स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळून आल्या. रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी अन्नसेवन करत असल्याने सार्वजनिक आरोग्याचा विचार करून कॅन्टीनचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला.

Mumbai food safety action
Raigad Gauri Festival: हात सोडून डोक्यावर तोल सांभाळत नाचवली जाणारी अनोखी गौराई

कुलाब्यातील ऑलिम्पिया कॉफी हाऊसमध्ये अन्न तयार करण्याची व भांडी धुण्याची जागा अस्वच्छ असल्याचे आढळले. अन्न जमिनीवर हाताळले जात होते. अस्वच्छ पाण्याचा वापर, झुरळे व माशांचा प्रादुर्भाव, रेफ्रिजरेटरमध्ये मांस व रक्ताचे अवशेष तसेच कच्चे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे ठेवले जात नसल्याचे तपासणीत आढळले. कर्मचाऱ्यांकडून आवश्यक संरक्षक पोशाखाचाही वापर केला जात नव्हता.

धक्कादायक बाब म्हणजे, ३५ पैकी ३४ अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक अन्नसुरक्षा प्रशिक्षण घेतलेले नव्हते. पाण्याच्या तपासणीचा अहवाल आणि आवश्यक स्वच्छता नोंदीही उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे ऑलिम्पिया कॉफी हाऊसचा परवाना निलंबित करण्यात आला.

Mumbai food safety action
Bombay High Court : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा

घाटकोपर, चेंबूर, वरळी, मालाडमध्येही कारवाई

ऑलिम्पिया कॉफी हाऊसबरोबरच ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, चेंबूर; विश्वास स्वीट्स अँड स्नॅक्स व ए-१ जनरल अँड ड्राय फ्रूट्स, घाटकोपर पश्चिम; मिलन पंजाब, वरळी; तसेच सद्गुरू स्वीट्स, मालाड पूर्व या आस्थापनांचेही परवाने निलंबित करण्यात आले. राज्यभरातील मोहिमेत २७ हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ आस्थापनांचे परवाने निलंबित, तर १३ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या. अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, त्रुटींची पूर्तता करून पुन्हा तपासणी होईपर्यंत निलंबित आस्थापनांना अन्नपदार्थांची खरेदी, निर्मिती, साठवणूक, विक्री किंवा वितरण करता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news