

ठाणे : कल्याण येथील मॅक्सी मैदान, रामबाग लेन, नूतन हायस्कूल समोर, कर्णिक रोड येथे बुधवार (दि.7) रोजी आज दुपारी 4 वाजता ऑपरेशन अभ्यासावर आधारीत मॉक ड्रिल होणार आहे.
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर बुधवार (दि.7) रोजी दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन (भोंगा) वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.
नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे.