बोर्डाचा निर्णय न झाल्याने नवीन शैक्षणिक धोरण अधांतरी

बोर्डाचा निर्णय न झाल्याने नवीन शैक्षणिक धोरण अधांतरी

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी दहावी बोर्ड रद्द झाले तर अकरावी बोर्ड होणार का याबाबतचा निर्णय अद्याप न झाल्याने नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला ब्रेक लागला आहे.

राज्य सरकारने 2023 या शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचे घोषित केले; मात्र अधिकृतपणे अकरावी बोर्डाची घोषणा नसल्याने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी येत आहेत. सर्वच स्तरावर गोंधळ असल्याने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कोकणातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकार्‍यांना याबाबत विचारले असता, याबाबतची सुसूत्रता स्पष्ट होत नसल्याने अंमलबजावणीत अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात चालू शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे', असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मात्र शैक्षणिक आराखडा तयार नसताना चालू वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करणार, असा प्रश्न शिक्षण तज्ज्ञांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news