Bhiwandi Firing: पाळीव श्वानाने कोंबड्या फस्त केल्या; जाब विचारल्याने शेजाऱ्यावर पिस्तुलाने गोळी झाडली

भिवंडीतील घटना; हल्लेखोराला अटक; कारवाईची मागणी
Bhiwandi Firing
Bhiwandi FiringPudhari
Published on
Updated on

भिवंडी: केवळ श्वाने कोंबड्या फस्त केल्याचा जाब विचारला म्हणून शेजाऱ्याने आपल्या बाजुला राहणाऱ्या सख्क्या शेजाऱ्यावर पिस्तुलाने गोळी झाडल्याची घटना भिवंडीत घडली. यामध्ये सदर इसमाला गोळी लागली नसली तरी ही गोळी खिडकीवर लागल्एाने या खिडकीची काच लागून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याचे समोर आले आहे.

एका शेजाऱ्याच्या पाळीव श्वानाने दुसऱ्या शेजाऱ्याच्या पाळीव कोंबड्या खाल्ल्याने त्या शेजाऱ्याने कोंबड्या खाल्ल्याचा जाब श्वानाच्या मालकाला विचारल्याच्या रागातून श्वान मालकाने कोंबडी पाळणाऱ्या शेजाऱ्यावर पिस्तुलने गोळी झाडून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भरोडी गावातून समोर आली आहे.

Bhiwandi Firing
Firte Pathak Scheme: रस्त्यावर राहणाऱ्या दुर्लक्षित बालकांनाही मिळणार हक्काचे बालपण; २२ जिल्ह्यांमधील मुलांसाठी फिरते पथक

सुदैवाने कोंबडी मालकाने पिस्तुलचा हल्ला चुकवल्याने त्याचा जीव वाचला असून पिस्तूल हल्ल्या दरम्यान खिडकीची काच फुटल्याने त्याचा तुकडा लागून कोंबडी मालक किरकोळ जखमी झाला आहे. दुर्गाप्रसाद जयप्रकाश नायक (५२) असे गुन्हा दाखल झालेल्या श्वान मालकाचे नाव आहे. तर अजय शशी गायकवाड (४३) असे जखमी शेजाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी हे दोघेही अंजूर गावात राहत असून एकमेकांच्या शेजारी राहत आहेत. दरम्यान १४ जून रोजी १२ वाजताच्या सुमारास दुर्गाप्रसाद आणि अजय यांच्यात या पूर्वीपासून चे वाद असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यातच दुर्गाप्रसाद च्या पाळीव श्वानाने अजय याच्या ५ कोंबड्या फस्त केल्या.

याचाच जाब अजयने दुर्गाप्रसाद यास विचारत नुकसान भरपाईची मागणी करताच या गोष्टीचा राग मनात धरून दुर्गाप्रसादने घरातूनच शिवीगाळ करून अजयच्या दिशेने त्यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलने गोळी झाडली.

Bhiwandi Firing
Bullet Train: पुढील वर्षी धावणार पहिली बुलेट ट्रेन; मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम 'सुपरस्पीड'मध्ये!

परंतु सुदैवाने अजयने हा हल्ला चुकवल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. परंतु पिस्तूलची गोळी अजयच्या घराच्या खिडकीला लागून काच फुटून त्याच्या करंगळीला लागून तो किरकोळ जखमी झाला आहे. त्यानंतर अजय तिथून कसातरी बचाव करून नातेवाईकांसह घरातून घाबरून पळून गेला.

तर या हल्ल्याप्रकरणी अजयच्या तक्रारीवरून नारपोली पोलिस ठाण्यात भान्यासं तेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून दुर्गाप्रसाद नायक यास तात्काळ ताब्यात घेत अटक केली असून त्याच्याकडून पिस्तुलसह काडतूस जप्त केले आहेत.तर दुर्गाप्रसाद ह्याला न्यायालयात हजर केले असता २९ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि योगेश काकड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news