Bullet Train: पुढील वर्षी धावणार पहिली बुलेट ट्रेन; मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम 'सुपरस्पीड'मध्ये!

विकासाला मिळणार चालना
Bullet Train
Bullet TrainPudhari
Published on
Updated on

ठाणे: देशातल्या पहिल्याच बुलेट ट्रेनसाठी पहिल्यांदाच डोंगरांमधील बोगद्यांबाहेर टनेल हुड उभारण्यात येत आहेत. महाराष्ट्रात असे एकूण सात बोगदे असल्यामुळे असे सात हुड बांधले जातील मुंबई: नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बांधणी होत असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता आणखी एक अभियांत्रिकी अविष्कार देशवासीयांना अनुभवायला मिळणार आहे.

बुलेट ट्रेनच्या वेगामुळे निर्माण होणाऱ्या हवेचा दाब योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी बोगद्यापुढे खिडक्या असलेले हुड तयार करण्यात येत आहे. यामुळे हवेच्या दाबाची तीव्रता कमी होऊन हवेचा प्रवाह अधिक सुरळीत राहणार आहे. राज्यात एकूण सात बोगदे असून सर्वापुढे असे हुड तयार होत आहेत. देशातील रेल्वे बोगद्यात पहिल्यांदाच असा प्रयोग होत आहे.

Bullet Train
Konkan Railway Upgrade: कोकणरेल्‍वे मार्गाचे दुपदरीकरण होणार

बोगद्याबाहेरील हूड्स खुले वातावरण आणि बोगदा यांमधील संक्रमण क्षेत्र म्हणून कार्य करतात. प्रत्येक बोगद्याच्या लांबीनुसार हुड तयार करण्यात आले आहे. हुडमध्ये खिडक्याची व्यवस्था करण्यात आली आहे. खिडक्यांच्या मदतीने हवा अधिक हळूहळू आत-बाहेर येते. त्यामुळे हवेच्या दाब लहरींवर नियंत्रण राहून हवेचा प्रवाह अधिक सुरळीत राहतो.

परिणामी संपूर्ण प्रणाली सुरक्षित राहते. बोगद्याच्याबाहेरील खिडक्या असलेल्या हूडमुळे बुलेट ट्रेनचा हाय स्पीड प्रवास अधिक शांत, सुरळीत आणि आरामदायी होणार आहे. जपान, फ्रान्स आणि इतर उच्च-वेग रेल्वे असलेल्या देशांमध्ये टनेल हुड्स ही सर्वसाधारण बाब मानली जाते. सर्वोच्च वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन प्रणालीमध्ये बोगदा हुड हे एक वैशिष्ट्य आहे.

प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर भारतातील रेल्वे बोगद्यांमध्ये प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे.सुरक्षितता, प्रवासी आराम आणि पर्यावरणीय कार्यक्षमतेच्या जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी प्रगत अभियांत्रिकी उपाययोजना आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींचा वापर करण्यात येत आहे, असे एनएचएसआरसीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Bullet Train
Thane Water Cut: गुरूवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद

हुडमुळे काय फायदा होणार?

नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर राज्यात सात आणि गुजरातमधील एका असे एकूण आठ बोगदे उभारण्यात येत आहेत. हुड म्हणजे विस्तारित छत होय. बोगद्याच्या बाहेरून ही रचना बोगद्याच्या विस्तारित छतासारखी दिसते. बुलेट ट्रेन वेगाने बोगद्यात प्रवेश करते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हवा पुढे ढकलते.

ही प्रक्रिया सिलेंडरमधील पिस्टनच्या हालचालीसारखी असते. बुलेटच्या वेगवान प्रवेशामुळे दाबलहरी (प्रेशर वेव्ह्स) निर्माण होतात. यांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास बुलेट ट्रेन बोगद्यातून बाहेर पडताना मोठा धडधडणारा आवाज निर्माण होऊ शकतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हुड उभारले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news