Naxalite Arrest in Thane: १० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठाण्यात सापडला; १० दिवसांपासून ठाकुर्लीत बसला होता लपून

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) १० लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवाद्याला ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली परिसरातून ताब्यात घेतले आहे.
Maharashtra Anti Terrorism Squad
Maharashtra Anti Terrorism SquadFile Photo
Published on: 
Updated on: 

Naxalite Arrest in Thane

ठाणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ठाणे जिल्ह्यातील ठाकुर्ली परिसरातून नक्षलवादी संजय सरजू यादव ऊर्फ गोदाराम यादव (वय ४५) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर झारखंड पोलिसांकडून १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

पलामू जिल्ह्यातील छतरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगन गावचा रहिवासी असलेला यादव, नक्षलवादी संघटनेचा 'झोनल कमिटी' सदस्य असल्याचे समजते. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, तो गेल्या १० दिवसांपासून ठाकुर्ली येथे लपून बसला होता. महाराष्ट्र एटीएसने त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांनी त्याला अटक केली आहे.

Maharashtra Anti Terrorism Squad
Thane Crime : नशेच्या विदेशी गोळ्या, 2 किलो हायब्रीड गांजासह एक अटकेत

'एलओसी'वर जवानांची जल्लोषात दिवाळी

जम्मू : सीमेवर तैनात भारतीय लष्कराचे जवान घर आणि कुटुंबीयांपासून दूर राहून दिवाळी साजरी करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात जवानांनी दोन दिवस आधीच दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला.

नियंत्रण रेषेजवळील चौक्यांवर हा दिवाळी सोहळा पार पडला. जवानांनी एकमेकांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. डोंगराळ भागातील लष्करी चौक्यांवर या उत्सवामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या जवानांसाठी त्यांचे सहकारीच कुटुंबीयांची भूमिका बजावत असल्याचे या सोहळ्यातून दिसून आले.

एका जवानाने सांगितले की, आम्ही नियंत्रण रेषेवर देशाच्या सीमांचे रक्षण करत आहोत. आमचे कुटुंबीय दूर असले, तरी सुरक्षेचे कर्तव्य आम्ही निष्ठेने पार पाडत आहोत. नागरिकांनी प्रियजनांसोबत सुरक्षितपणे सण साजरा करावा, यासाठी आम्ही सतर्क आहोत.

Maharashtra Anti Terrorism Squad
Creamy Layer: 'क्रीमी लेयर'बाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; आरक्षण केवळ आई-वडिलांच्या उत्पन्नावरून ठरणार नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.