

आशिया खंडातील सर्वात मोठे नवी मुंबई विमानतळ
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयएएल) ही महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची रचना, विकास, बांधकाम, कामकाज, देखभाल, व्यवस्थापन व विस्तार आदी कामांसाठी विशेष हेतूने स्थापन करण्यात आलेली कंपनी (स्पेशल पर्पज व्हेइकल) आहे. हा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी) आणि सिडको (सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड) यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतील (पीपीपी) प्रकल्प असून याचे 74 टक्के भागभांडवल मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडकडे तर 26 टक्के भागभांडवल सिडकोकडे आहे. मुंबई महानगर प्रदेश आणि पश्चिम भारतातील हवाई वाहतुकीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी शाश्वत विमानतळ उभा करण्याकरता एनएमआयएएल बांधील आहे. या विमानतळामुळे भारताची जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीही अधिक चांगली होणार आहे.
विमानतळ उलवे, नवी मुंबई दक्षिण मुंबईपासून 37 कि. मी. अंतर
उभारणीमध्ये 26 टक्के भाग भांडवल मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड. खासगी भागीदारी 74 टक्के पीपीपी तत्वावरील प्रकल्प.
हे विमानतळ भारताची जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हीटी 30 टक्क्यांनी वाढवणार.
धावपट्टी 1 : 3 हजार 700 मीटर, रुंदी 60 मीटर; धावपट्टी 2 : 3 हजार 700 मीटर, रुंदी 60 मीटर
चार टर्मिनल अंतीम टप्प्यात आहेत.
प्रारंभिक टप्पा देशांतर्गत आणि अंतर्गत कामकाजासाठी एकच टर्मिनल वापरणार
प्रवासी संख्या : 20 लाख, प्रारंभी. एमपीपीए, तर अंतीम 90 लाख.
एकूण प्रकल्प क्षेत्र : 1 लाख 160 हेक्टर
मालवाहतूक क्षमता : 3.2 दशलक्ष मेट्रीक टन
भारताचे राष्ट्रीय पुष्प : कमळ, प्रेरणा देणारे स्थापत्य. 12 शिल्पात्म फुलांचे स्तंभ, 17 भव्य स्तंभ, कमलाकार छतांचे आच्छादन.
टप्पा 1 टर्मिनल 1 : 234 चौरस मीटर, टर्मिनल 2: 400 चौरस मीटर, टर्मिनल 3 : आंतरराष्ट्रीय, टर्मिनल 4 : आंतरराष्ट्रीय
टर्मिनल 3 आणि 4 सुरू होईपर्यंत टर्मिनल 1 वरून आंतरराष्ट्रीय विमाने सुटणार. टर्मिनल 2 केवळ देशांतर्गत विमानांसाठी असणार आहे.
पूर्णपणे स्वयंचलित मालवाहतूक टर्मिनल सुरू होणार.
मालाची 100 टक्के ट्रेकिंग व्यवस्था.
ट्रक व्यवस्थापन प्रणाली आणि कार्गो समुदाय प्रणाली कार्यान्वित होणार.
संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने
प्रगतशीत साखळी लॉजिस्टीक : नाशवंत मालासाठी वापरणार.
धोकादायक साहित्य वापरण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी, ड्रोन आणि एक्स्प्रेस कार्गो सेवा. जलदगती माल पाठविण्याची व्यवस्था.
जेएनपीए पासून 14 किमी अंतर.
एमआयडीसी तळोजापासून 22 कि.मी अंतर, मुंबई पोर्ट ट्रस्टपासून 35कि. मी. ठाणे शहरापासून 32 कि.मी. भिवंडीपासून 40 किमी अंतर.
प्रवासी विमाने : 245, मालवाहतूक विमाने : 7, देशांतर्गत विमाने 69, जीए हँगर्स विमाने : 16 या विमानतळावर राहू शकतील.
उद्घाटन होणारा नवी मुंबई विमानतळ कसा आहे प्रकल्प?
उल्वे, नवी मुंबई येथे 1,160 हेक्टर (सुमारे 2,866 एकर) जमिनीवर विस्तारलेला हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलवर आधारित आहे. यामध्ये अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लि. ची उपकंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचा 74 टक्के तर सिडकोचा 26 टक्के वाटा आहे. विमानतळाची प्रारंभिक क्षमता दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची आहे. अंतिम टप्प्यात (एकूण 4 टर्मिनल्स पूर्ण झाल्यावर) ही क्षमता वाढून तब्बल 90 दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष इतकी होणार आहे. यासोबतच, मालवाहतूक हाताळणीची क्षमता प्रारंभिक 0.5 दशलक्ष मेट्रिक टनावरून वाढून 3.2 दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष होईल. येथे प्रत्येक 3,700 लांबीच्या दोन कोड एफ अनुरूप समांतर धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.
आकर्षक डिझाईन आणि तंत्रज्ञान भारतातील ठरणार लक्षवेधी
स्थापत्यशास्त्र भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईनने प्रेरित आहे. प्रवाशांसाठीचा अनुभव अधिक जलद आणि संपर्क-मुक्त करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. येथे 5 कनेक्टिव्हिटी आणि डिजी यात्रा सुविधा उपलब्ध असेल. टर्मिनल 1 मध्ये 66 चेक-इन काउंटर, 22 सेल्फ-बॅगेज ड्रॉप युनिट्स आणि 29 एरोब्रिजेसची सुविधा असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी 80 खोल्यांचे ट्रान्झिट/डे हॉटेल आणि प्राणाम सेवा उपलब्ध असेल. नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम ठरणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, रस्ते, रेल्वे आणि मेट्रोसोबतच, हे विमानतळ वॉटर टॅक्सी सेवांनी जोडले जाईल. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट पासून हे केवळ 14 किमी दूर असल्यामुळे मालवाहतुकीसाठी हे एक मोठे केंद्र ठरेल.
नवी मुंबई विमानतळ कसा आहे प्रकल्प?
विमानतळाचे स्थळ - उलवे, नवी मुंबई, दक्षिण मुंबईपासून सुमारे 37 किलोमीटर अंतरावर
आयएटीए/ आयसीएओ कोड- एनएमआय/ व्हीएएनएम
धावपट्ट्या (नियोजित) ः ‘कोड एफ’चे पालन करणार्या दोन समांतर धावपट्ट्या
धावपट्टी 1 : 3,700 मीटर लांबी/ 60 मीटर रुंदी
धावपट्टी 2 : 3,700 मीटर लांबी/ 60 मीटर रुंदी
टर्मिनल्स (नियोजित)
चार टर्मिनल्स (अंतिम टप्प्यात)
प्रारंभिक टप्पा : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाजासाठी एकच एकात्मिक टर्मिनल
अंदाजित प्रवासी क्षमता
प्रारंभिक टप्पा : वर्षभरात 20 दशलक्ष प्रवासी (एमपीपीए)
अंतिम टप्पा : 90 एमपीपीए
एकूण प्रकल्प क्षेत्र
1,160 हेक्टर / सुमारे 2,866 एकर
अंदाजित मालवाहतूक क्षमता
प्रारंभिक टप्पा : वर्षभरात 0.5 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटीपीए)
अंतिम टप्पा : वर्षभरात 3.2 दशलक्ष मेट्रिक टन
डिझाइनची प्रेरणा
भारताचे राष्ट्रीय पुष्प कमळावरून प्रेरित स्थापत्य
12 शिल्पात्मक वैशिष्ट्यपूर्ण स्तंभ फुलांच्या उमलणार्या पाकळ्यांसारखे उंचावणारे आधारस्तंभ
17 भव्य स्तंभ कमलाकार छताच्या आच्छादनाचे वजन सांभाळणारे अदृश्य खांब
देशाच्या विकासात योगदाने देणारे उलव्याचे विमानतळ
समस्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबईतील उलवे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या विमानतळाचे व्यवस्थापन व देखभालीची जबाबदारी अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीची उपकंपनी असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड आणि सिडको यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
वाढत्या मुंबईला आणि वेगाने विस्तारित होणार्या महामुंबईकरांना भरारी घेण्यासाठी आणखी एका विमानतळाची गरज होती, ती गरज उलवे येथील विमानतळाने पूर्ण झाली आहे. सुमारे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रावर असलेल्या या विमानतळावर 4 टर्मिनल असणार आहेत. प्रारंभिक टप्प्यात या विमानतळावरून सुमारे 20 दक्षलक्ष प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. विमानतळाचे टर्मिनल 1 हे 2,34,000, टर्मिनल -2 4,00000 चौरस मीटर क्षेत्रफळावर विस्तारलेले आहे.
कनेक्टिव्हिटी हे विमानतळ मुंबईकरांसाठी 37 तर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स या बंदरापासून 14, तळोजा औद्योगिक वसाहतीपासून 22, मुंबई पोर्ट ट्रस्ट पासून 35 तर ठाण्यापासून 32 तर भिवंडीतून 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशातंर्गत प्रवासासह कार्गो मुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शेतकर्यांना उपलब्ध होणार आहे. कार्गो हब मध्ये वर्षभरता सुमारे 0.5 दशलक्ष मेट्रिक टन मालाची साठवण क्षमता असून अंतिम टप्प्याच्या पूर्ततेनंतर वर्षभरता 3.2 दशलक्ष मेट्रीक टन मालवाहतूक करण्याचे उद्दीष्ट आहे.
औषधे व नाशवंत पदार्थांच्या वाहतूकीसाठी उच्च दर्जाची शीतसाखळी उपलब्ध आहे. तसेच धोकदायक आणि मौल्य वस्तूंच्या हाताळणीसाठी प्रशिक्षित कर्मचारी तैनात असणार आहे. विमानतळावरील र्सव ओळखपत्रे व बोर्डिंग तपासणी सुविधा ही मानवरहित असणार आहे. स्वयंचलित संवादाद्वारे स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन केले जाणार आहे. केवळ सोयी सुविधांनी अद्यावत असे हे विमानतळ नाही तर महाराष्ट्र आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणार्या विविध कलाप्रकारांचे दर्शन घडणार आहे. सुमारे 500 व्यक्तींना सामावून घेतील असे लाऊंज असणार आहे. शिवाय लघुकालीन वास्तव्यासाठी 80 निवास खोल्यांची सोयही असणार आहे.