

मुंबई : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनैतिक संबंध प्रस्तापीत करून ब्लॅकमेल करणार्या ज्योती महेंद्र माला या तरुणी विरोधात दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून पत्नी आणि मुलीसोबत प्रभादेवी येथे राहतात. ते ग्रँटरोड येथे बँकेत मॅनेजर आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या बँकेत एक आधार सेंटर सुरू झाले. तेथे आरोपी तरूणी काम करीत होती. एकाच ठिकाणी काम करीत असल्याने त्यांच्यात ओळख झाली. तक्रारदाराची पार्श्वभूमी माहित असतानाही ती तक्रारदाराबरोबर मथुरा येथे गेली. नतंर तक्रारदाराची पत्नी घरी नसताना ती त्यांच्या घरी तीन दिवस राहिली.
या दरम्यान त्यांच्यात संमतीने शारीरिक संबंध आले होते. दरम्यान तिचे आधार सेंटरमधील काम गेले. त्यांनी तिला पाच लाख रुपये दिले होते. तरीही ती त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होती. दरम्यान, तिने दुसर्या एका तरुणाशी अशीच जवळीक करून पाच लाख रुपये घेतले होते. त्यामुळे तक्रारदार तिला टाळू लागले होते. त्यामुळे आरोपी तरुणीने त्यांना ब्लॅकमेल करीत 25 लाखांच्या खंडणी मागितली.
ही रक्कम दिली नाहीतर पत्नीला सवैकाही सांगण्याची धमकी दिली होती. बलात्काराची केस करण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळे एका वकिल महिलेला मध्यस्थी करीत समझौत्याचा प्रयत्न केला. मात्र तिची मागणी वाढली होती. तिला पाच लाख कॅश स्वरुपात देण्यात आले. मात्र 25 लाख मिळाल्याशिवाय माघार घेण्यास ती तायर होत नव्हती. त्यामुळे अखेर कंटाळून त्यांना दादर पोलिसांत तक्रार दिली आहे.