Liquor License Transfer Fraud | दारू परवाना हस्तांतरणाच्या आमिषाने नाशिकच्या शेतकऱ्याला गंडा

1.44 Crore Fraud | १.४४ कोटींची फसवणूक प्रकरणी एमएफसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Liquor License Transfer Fraud
दारू परवाना हस्तांतरणाच्या आमिषाने नाशिकच्या शेतकऱ्याला गंडाFile Photo
Published on
Updated on

Farmer Fraud

डोंबिवली : पनवेलमधील मस्तानी देशी दारू दुकानाचे लायसन्स नावावर करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा सारा प्रकार २४ जुलै २०२४ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे.

या संदर्भात नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील खडक/माळेगावचे रहिवासी असलेले निलेश संजय वारूळे (२९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कल्याणमधील कल्पेश तारमळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपीने पनवेलमधील मुकुंद म्हात्रे यांच्या नावावर लायसन्स मूळ मालक असलेले मस्तानी देशी दारू दुकान तक्रारदार निलेश वारूळे यांना त्यांच्या नावावर हस्तांतरित करून देण्याचे अमिष दाखविले. यासाठी सदर इसमाने तक्रारदार निलेश आणि त्यांच्या भावाकडून वेळोवेळी १.४४ कोटी रूपये उकळले. त्यापैकी ६१ लाख रूपये मूळ मालकास दिल्याचा दावा सदर इसमाने केला. मात्र उर्वरित रक्कम मूळ मालकाला परत दिली नाही किंवा लायसन्स हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे पैसे परत मिळविण्यासाठी तक्रारदाराने वारंवार आरोपीकडे पाठपुरावा सुरू केला.

Liquor License Transfer Fraud
Dombivali News: बाप्पाच्या मूर्तीचे पैसे घेतले, चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्तिकार पसार; गणेश भक्तांमध्ये संताप

आरोपीने ९ एप्रिल रोजी सारस्वत बँकेचा आरती चेतोळे यांच्या खात्याचा ४ लाख रूपयांचा चेक दिला. मात्र, तो चेक खात्यात शिल्लक नसल्यामुळे बाऊन्स झाला. त्यानंतर इसमाने १ मे रोजी चिपळूण येथील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा स्वतःच्या खात्याचा ५३ लाख रुपयांचा चेक दिला, पण तोही बँकेत पुरेशी शिल्लक नाही म्हणून परत आला.

Liquor License Transfer Fraud
Dombivali News | डोंबिवलीतील पोस्ट- पासपोर्ट ऑफिस समोरचा सिमेंट काँक्रिट रोड तोडला

लायसन्स हस्तांतरित न करता आणि दीलेली रक्कम परत न केल्यामुळे आरोपीने हेतुपुरस्सर फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद पाटील अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news