Thane News : खासदार नरेश म्हस्के गेले कुणीकडे?

कार्यकर्त्यांचा हिरमोड : मिरा-भाईंदर शहरात फिरकलेच नसल्याने जनताही अचंबित
Naresh Mhaske public criticism
खासदार नरेश म्हस्केfile photo
Published on
Updated on

भाईंदर : राजू काळे

ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के निवडणुकीत विजयी झाल्यापासून मिरा-भाईंदर शहरात फिरकलेच नसल्याने ते आता जनतेच्याही विस्मरणात गेल्याचे दिसून आले आहे. हे खासदार गेले कुणीकडे, असा प्रश्न देखील आता लोकं विचारू लागली आहेत.

लोकसभा निवडणूका पार पडून पावणे दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ठाणे लोकसभा अंतर्गत मिरा-भाईंदर शहराचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत ठाणे लोकसभेतून शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के विजयी झाले, त्यांच्या या विजयानंतर त्यांचा लोकसभा अंतर्गत मिरा-भाईंदर शहरात फिरकलेच नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मागील काही विकासकामांच्या लोकार्पणवेळी देखील त्यांनी अनुपस्थिती दाखविली होती. यामुळे म्हस्के हे केवळ आपल्या विजयापुरतीच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होती कि काय, असा प्रश्न लोकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

Naresh Mhaske public criticism
Thane local body elections : ठाणे जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाची मोर्चेबांधणी

येथील मच्छीमारांच्या तसेच रेल्वे प्रवाशांच्या केंद्र सरकारसंबंधित समस्या असतानाही त्यांना त्याची तसदी घेण्यासाठी वेळ मिळत नसावा इतके म्हस्के व्यस्त झाले आहेत कि काय, असा उपरोधिक टोला लोकांकडून लगावण्यात येत आहे. केवळ कागदी घोडे दाखवत आपण शहराशी तसेच मतदारांशी बांधिल आहोत, अशा अविर्भावात असलेले खा. म्हस्के मिरा-भाईंदरकरांच्या विस्मरणात गेल्याचे दिसून आले आहे. सध्या भाईंदर पूर्वेकडील पोस्ट ऑफिस अचानक बंद झाल्याने तेथील लोकांची गैरसोय झाली आहे. तर काहींना खासदार कोण आहेत, त्यांचे नाव देखील सांगता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

यापूर्वी देखील शहरातील लोकांनी खासदार म्हस्के यांचा शोध घेतला असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांची बाजू घेत त्यांचे जनसंपर्क कार्यालय शहरात सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र खासदारांच्या या जनसंपर्क कार्यालयाला अद्याप मुहूर्त मिळाला नाही का, असा संतप्त प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे.

Naresh Mhaske public criticism
Money rain fraud case : पैशाचा पाऊस पाडतो सांगून केली फसवणूक

म्हस्के हे वोट चोरी करून खासदारपदी निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना मिरा-भाईंदर येथील लोकांच्या तसेच शहरातील केंद्र शासनाशी निगडीत समस्यांचा त्यांना विसर पडलेला आहे. शहरातील मिठागरांच्या जमिनींवरील विकासासाठी त्या पालिकेकडे हस्तांतर करण्याकरीता त्यांच्याऐवजी खा. हेमंत सावरा यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. हि बाब अत्यंत खेदजनक असून ठाणे लोकसभा मतदार संघाला अदृश्य खासदार लाभल्याचे वाटू लागले आहे.

निलम ढवण, महिला जिल्हा संघटक (उबाठा शिवसेना)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news