पैसे घेऊन होतात अधिकाऱ्यांच्या बदल्या : नाना पटोले

पैसे घेऊन होतात अधिकाऱ्यांच्या बदल्या : नाना पटोले

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाचा वचपा कोकण पदवीधर मतदारसंघात विजय मिळवून काढू, या असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयपीएस, आयएएस आणि इंजिनअरच्या बदल्यांमधील भ्रष्ट्राचाराबद्दल भाजप -शिंदे सरकारला येत्या अधिवेशनात जाब विचारला जाणार असल्याचे सांगितले.

कोकण पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारासाठी गुरूवारी (दि.२०) एनकेटी महाविद्यालयाच्या सभागृहात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, सामान्य जनता, सुशिक्षित तरुणविरोधी भूमिकांवर टीकास्त्र सोडले.

लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या यशामुळे संविधानाने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य आता अबाधित राहिले. प्रगत राष्ट्राने ईव्हीएम मशीनवर निवडणूक घेणे बंद केले असून भारतातही बॅलेट पेपरवर मतदार घ्यायला हवे. कोकण पदवीधारची निवडणूक बॅलेटवर असल्याने सगळ्यांची कसोटी लागली आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे. अन्यथा राजन विचारे आणि विनायक राऊत हे पडले नसते. सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाण्यातून विजय निश्चित होणार असून सगळ्यांनी एकजुटीने कामाला लावून महायुतीचा फुगा फोडू असे आवाहन पटोले यांनी यावेळी केले. तसेच  मणिपूर दंगल, बलात्कार, पेपरफुटी रोखण्यास अपयशी ठरलेले पंतप्रधान मोदी यांनी गाजापट्टीतील युद्ध थांबविल्याच्या बाता मारल्या जात आहेत, असे म्हणत पटोलेंनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. पोलीस आणि प्रशानाचा धाक नसल्याने वसईसारख्या घटना घडत असून राज्य सरकार सर्व आघाडयावर अपयशी ठरले आहे. येत्या अधिवेशनातं त्यांना जाब विचारला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डावखरे हे बिल्डरांच्या सुपाऱ्या वाजवितात : जितेंद्र आव्हाड

भाजप सरकारने केलेला ३५ लाख कोटींचा इलेक्टोरल बाँडचा घोटाळा आणि संरक्षण खात्यातील घोटाळ्यावरून देशात भूकंप होण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरचिटणीस जिंतेद्र आव्हाड यांनी यावेळी केले. तसेच पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याऐवजी अधिवेनाशात पैसे घेऊन प्रश्न विचारणे, बिल्डरांच्या सुपारी वाजविण्याचे काम पदवीधर आमदाराचे नसते, असा आरोप थेट नाव न घेता भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर आव्हाड यांनी केला.

रिफायनरीचे दूषित पाणी कोकणातील समुद्रात सोडल्याने एकही मासा जिवंत राहणार नाही, मासेमारी बंद होईल. मासेमारीवरील उद्योग बंद होतील आणि फिशरीमधील ४५ हजार तरुणांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती आव्हाड यांनी व्यक्त करीत रिफायनरी ऐवजी आयटी इंडस्ट्री कोकणात सुरु करण्याची मागणी केली. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेची लढाई ठाण्यातून सुरु करूया आणि महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल, यासाठी कामाला एकजूटीने कामाला लागण्याचे आवाहन आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी माजी मंत्री नसीम खान, माजी खासदार राजन विचारे, उमेदवार रमेश किर, ज्योती ठाकरे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर जेष्ठ नेते सुभाष कानडे, शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, सुहास देसाई, मनोज शिंदे, केदार दिघे, वैशाली दरेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news