Raigad Gram Panchayat Election: रायगडात 127 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी; 30 सरपंच, 170 सदस्यांसाठी मतदान

28 एप्रिलला मतदान, 29 एप्रिलला मतमोजणी; राज्यभरात 3,591 रिक्त जागांसाठी निवडणुका
Elections Voting
Elections VotingPudhari
Published on
Updated on

अलिबाग : जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असून, रिक्त पदांसाठीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Elections Voting
Murud Tourism Summer: आल्हाददायक हवामानामुळे मुरुडला पर्यटकांची पसंती; समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे फुलली

राज्यभरात 471 सरपंच आणि 3 हजार 120 सदस्य पदांसाठी निवडणुका होणार आहेत. रायगड जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींमधील 30 सरपंच आणि 170 सदस्य अशा एकूण 200 जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार असून, 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुका कधी लागणार याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. राज्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासकीय राजवट असून, काही ठिकाणी सरपंच व सदस्य पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. राजीनामे तसेच इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांसाठी या पोटनिवडणुका घेतल्या जात आहेत.

Elections Voting
Gas Shortage Panvel: गॅस टंचाईमुळे पनवेलमध्ये कोळशाला पुन्हा मागणी; नागरिकांचे हाल

30 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेचा प्रशासकीय टप्पा सुरू होणार आहे. तहसीलदारांकडून निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 4 ते 13 एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून, 17 एप्रिलला अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पार पडेल. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 28 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात होणार असून, 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

Elections Voting
Karjat Debt Case: पळसदरी धरणाजवळ आजार व आर्थिक कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, सांगली, वर्धा, वाशिम, गोंदिया आदी 34 जिल्ह्यांतील एकूण 2 हजार 444 ग्रामपंचायतींमधील 471 थेट सरपंच व 3 हजार 120 सदस्य अशा एकूण 3 हजार 591 रिक्त जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news