Murbad Mystery: मुरबाडमध्ये ‌‘दृश्यम‌’ सदृश थरार? उत्खननातून सांगाडा काढल्याची चर्चा

Drishyam Movie like case: पोलिसांकडून माहिती अद्याप गुप्त
Murbad Mystery
Murbad MysteryPudhari
Published on
Updated on

किशोर गायकवाड

मुरबाड शहर: मुरबाड शहरातील शासकीय रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या शवविच्छेदन गृहाच्या भिंतीलगत बुधवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.उत्खननातून सांगाडा काढल्याची चर्चा असून मुरबाडमध्ये ‌‘दृश्यम‌’ चित्रपटासारखाच काही थरार नाही ना, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

या दरम्यान वृत्तांकनासाठी गेलेल्या काही पत्रकार व पोलिसांमध्ये छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरणावरून किरकोळ वाद झाल्याची माहिती समोर आली. कायदेशीर कारणास्तव तपासात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने पोलिसांनी माध्यमांवर काही निर्बंध घातल्याचे सांगितले जाते.

Murbad Mystery
Crime News: वंचित आघाडी जिल्हा संघटकाच्या पित्याची जमावाकडून हत्या

दीर्घकाळ चाललेल्या उत्खननानंतर संबंधित ठिकाणी मानवी सांगाडा आढळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये पसरली आहे. तथापि, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. प्राथमिक स्तरावर काही जणांकडून हा सांगाडा जुन्या प्रकरणाशी संबंधित असू शकतो, असा केवळ अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या संदर्भात कोणतीही ठोस माहिती देण्यास नकार दिल्याने प्रकरणाविषयी संभ्रम कायम आहे.

Murbad Mystery
Pratap Sarnaik vs Narendra Mehta: आ. नरेंद्र मेहता, विहंग ग्रुपची एकमेकांना कायदेशीर नोटीस

सदर घटना गंभीर स्वरूपाची असल्याने विविध शक्यता व अफवा पसरत असल्या तरी अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे उचित ठरणार नाही, असे पोलिस सूत्रांनी सूचित केले आहे.मात्र, या घटनेमुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रकरणाचा सखोल तपास करून वस्तुस्थिती लवकरात लवकर स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news