Thane Accident : मुरबाड महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

रिक्षाच्या धडकेत विद्यार्थिनी तर बस अपघातात इसम ठार
Murbad Highway Accident
Murbad Highway Accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

टोकावडे :मुरबाड राष्ट्रीय महामार्ग ६१ वर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे मुरबाड तालुक्यातील महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा आणि आर.टी.ओ. विभागाच्या कारवाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बुधवारी सकाळी सुमारे ६.४५ च्या सुमारास सरळगाव येथील मुक्ताबाई नगरसमोर भरधाव पिकअप वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. नारायणगावहून मुरबाडच्या दिशेने पिकअप येत होती. मात्र समोर जात असणारी रिक्षा धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.

Murbad Highway Accident
Konkan Kanya Express Delay : मांडवी एक्स्प्रेस तब्बल तीन दिवस लेट

या दुर्घटनेत नांदगाव येथील काॅलेजमध्ये डिग्रीचे शिक्षण घेणारी महेश्वरी वसावे (वय १९ रा. भाईंदर) या विद्यार्थिनीचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक मंगेश व्यापारी यांच्यासह अन्य चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयामध्‍ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर रिक्षा मुरबाड तालुक्यातील मानिवली व्यापारी येथील असून रोज या रिक्षातून मानिवली ते सरळगाव अशी प्रवासी वाहतूक होत असते. त्यामुळे पुन्हा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत ठोस कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

Murbad Highway Accident
Goa Bus Overcrowding | अमानुष... 48 आसनांच्या बसमधून तब्बल 140 प्रवाशांची वाहतूक!

बस अपघात...

दुसरी घटना मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील गौरी हॉटेल समोर घडली. बस पारनेरच्या दिशेने जात असताना झालेल्या अपघातात माळ येथील केशव राम मोंडुला (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विमल हरी खोडका या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

मुरबाड तालुक्यात भरधाव वाहने, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. मात्र, वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे आर.टी.ओ. विभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनांची नियमित तपासणी, वेगमर्यादेचे पालन, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.