Goa Bus Overcrowding | अमानुष... 48 आसनांच्या बसमधून तब्बल 140 प्रवाशांची वाहतूक!

Goa Bus Overcrowding | दिवाळीसाठी गावी निघालेल्या कामगारांची जीवघेणी कोंबाकोंबी
Goa Bus Overcrowding
Goa Bus Overcrowding
Published on: 
Updated on: 

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी गावी निघालेल्या गरीब कामगारांच्या जिáशी खेळण्याचा संतापजनक प्रकार म्हापसात उघडकीस आला आहे. अवघी ४८ प्रवाशांची आसनक्षमता असलेल्या खासगी आंतरराज्य बसमधून तब्बल १४० प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे आढळले.

Goa Bus Overcrowding
Sindhudurg Crime : गोवा दारू वाहतूकप्रकरणी चौघांवर गुन्हा

प्रवाशांना अक्षरशः मेंढारासारखे कोंबून नेणाऱ्या या बसला म्हापसा वाहतूक पोलिसांनी बोडेश्वर मंदिराजवळ अडवून ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
मध्य प्रदेशातील मालकीची ही खासगी 'सीटर-कम-स्लीपर' बस म्हापसातून मध्य प्रदेशातील इंदूरमार्गे उत्तर प्रदेश आणि तिथून नेपालच्या सीमेकडे रवाना झाली होती.

राज्यातील विविध भागात काम करणारे नेपाल आणि उत्तर प्रदेशातील कामगार दिवाळी सणासाठी आपल्या मूळ गावी परतत होते. नेपाळपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण चार दिवसांचा प्रवास करावा लागतो. एवढ्या लांबच्या प्रवासासाठी बसमध्ये करण्यात आलेली प्रवाशांची अमानुष कोंबाकोंबी पाहता, प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा अधिकाधिक प्रवासी भरून पैसे कमावण्यालाच प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट झाले. बसमध्ये दोन जणांसाठी असलेल्या जागेवर सात ते आठ जणांना बसवण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.